Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : लाचखोर तलाठी जाळ्यात; हक्कसोड पत्रासाठी घेतले पैसे, खासगी...

Nashik Bribe News : लाचखोर तलाठी जाळ्यात; हक्कसोड पत्रासाठी घेतले पैसे, खासगी व्यक्ती ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हक्कसोड पत्राद्वारे सातबारा उताऱ्यावरील नाव पुन्हा लावून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना देवळा तालुक्यातील वाजगाव रोडवर तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Department) रंगेहाथ पकडले. पप्पू काशिनाथ सोनकांबळे (४६, रा. आहेर वस्ती, देवळा) असे संशयित तलाठ्याचे नाव असून, प्रशांत दावल सोनवणे (२४, रा. खामखेडा, देवळा) असे त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

तक्रारदाराची खामखेडा शिवारात (Khamkheda Area) शेती आहे. या शेतीवरून हक्कसोड पत्राद्वारे बहिणीचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी सोनकांबळे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, तलाठ्याच्या चुकीमुळे बहिणीसोबत तक्रारदाराचेही नाव ७/१२ वरून कमी झाले. याविषयी तक्रारदाराने चौकशी केली असता ७/१२ उताऱ्यावर त्यांचे नाव पुन्हा लावण्यासाठी तलाठी सोनकांबळे याने लाचेची मागणी केली.

तसेच प्रशांत सोनवणे याने तक्रारदाराला ही लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून शुक्रवारी (दि. २२) दुपारी वाजगाव रोडवर सापळा रचला. दुपारी साडेतीन ते पाच वाजेच्या दरम्यान तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोघा संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

गाडीबाहेर पैसे फेकले

कारवाईनंतर संशयित तलाठी सोनकांबळे याला शासकीय वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेले जात होते. यावेळी त्याने आपले पाप लपवण्यासाठी खिशातील लाचेची रक्कम चालत्या गाडीबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...