नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभा निवडणूकीमुळे (Loksabha Election) आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर व ग्रामीण पोलिसांनी १६ मार्च ते २० मे या कालावधीत २ कोटी २७ लाख ४४ हजार ६७५ रुपयांचा अवैध मद्यसाठा (Illegal liquor)व गुटखा साठा जप्त (Seized) केला आहे. तसेच ७ हजार ४६३ टवाळखोर व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला चार ते पाच वाहनांची तोडफोड
लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजताच देशभरात आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले. शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व ग्रामीण मध्ये पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने (Vikarm Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, अवैध मद्यवाहतूक, गुटखा वाहतूक रोखणे, अंमली पदार्थ विक्री रोखण्यावर भर देण्यात आला.
हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : मुंढेगावजवळ विहिरीत आढळला मायलेकींचा मृतदेह
ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) अवैध मद्य विक्री व वाहतूक प्रकरणी १ हजार ३१९ गुन्हे दाखल करुन १ कोटी २९ लाख १२ हजार ९०७ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. त्याप्रकरणी १ हजार २३३ संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच अवैध गुटखा प्रकरणी ९८ जणांविरोधात ८० गुन्हे दाखल करून ५६ लाख ४५ हजार ४० रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. तर ३ हजार ६३१ टवाळखोर, गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : IPL 2024 : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना
तडीपार, मोक्काचा दणका
सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी तडीपारी, मोक्का, स्थानबद्ध अशा कारवाई केल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी २ व ग्रामीण पोलिसांनी एका टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्यानुसार १० गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तर सुमारे १०० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
२२ काडतूस हस्तगत
शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून १४ कट्टे, २२ काडतुसे, ७१ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच ७ लाख ५० हजार १५५ रुपयांची १ हजार ५३३ लिटर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. गुटखा साठा-वाहतूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करीत ३४ लाख ३६ हजार ५७३ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. तर एमडी प्रकरणी तीन व गांजा प्रकरणी ३ गुन्हे दाखल केले. तसेच ३ हजार ८३२ टवाळखोर व गुन्हेगारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत व शस्त्रबंदी कायद्यानुसार कारवाई झाली आहे.