Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik News : आज २०२४ ला निरोप, २०२५ चे स्वागत; तळीरामांसह टवाळखोरांची...

Nashik News : आज २०२४ ला निरोप, २०२५ चे स्वागत; तळीरामांसह टवाळखोरांची धरपकड सुरू

पहाटे सहा वाजेपर्यंत बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नववर्षाच्या (New Year) स्वागताचा उत्सव मंगळवारी (दि.३१) साजरा होणार असल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी (City and Rural Police) बुधवारी (दि. १) पहाटे सहापर्यंत बंदोबस्त तैनात केला आहे. शहर पोलिसांनी ‘ऑल-आऊट’ जाहीर करून टवाळखोरांसह तळीरामांची धरपकड सुरू केली आहे. शहरासह जिल्ह्यात नववर्ष स्वागत सेलिब्रेशन जोर धरत असल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून चौकाचौकांत पथके आज तळ ठोकणार असून, मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यातील (District) हटिल्स, बार, परमीट रुमची तपासणी सुरू झाली असून सोसायट्यांसह खासगी जागेत विनापरवानगी मद्य पार्टी करणा-यांवरही गुन्हे नोंदवण्याचा इशारा दिला आहे. तर बुधवारी देखील (दि.१) शहरासह जिल्ह्यातील सेलिब्रेशनवर पोलिसांची (Police) नजर असेल. ३१ डिसेंबर रोजी मंगळवार असल्याने सेलिब्रेशनचा जोर काहीसा कमी राहण्याचा अंदाज आहे.

परंतु तरुणाई व हौशी नागरिकांनी आखलेल्या प्लॅन्सनुसार, सकाळपासूनच पर्यटनस्थळांसह रिसॉर्ट, फार्महाऊस व बारमध्ये सेलिब्रेशन रंगणार आहे. त्यात १ जानेवारी रोजी पहाटे पाचपर्यंत बंदिस्त ठिकाणी परवानगीसहित सेलिब्रेशनची मुभा देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांचा फौजफाटा

शहर आयुक्तालय

उपायुक्त
सहाय्यक उपायुक्त
३० पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक
दीडशे पेक्षा जास्त उपनिरीक्षक
तीन हजार पोलीस निरीक्षक

ग्रामीण पोलीस

अप्पर पोलीस अधीक्षक
उपविभागीय अधिकारी
४० पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक
दोनशे पेक्षा जास्त उपनिरीक्षक
दीड हजार पोलीस कर्मचारी
अतिरिक्त शहर व जिल्ह्यात आठशे होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक

दृष्टिक्षेपात बंदोबस्त

पोलीस ठाणे पीटर मोबाईल (वरिष्ठ निरीक्षक)
पोलीस ठाणे झेब्रा व डीथी मोवाईल
(स्थानिक गुन्हे शाखा)
वाहतूक पोलीस चारही युनिट (सीटीबी)
निर्भया व दामिनी मार्शल्स: हद्दीतील बीट मार्शल्स
गुन्हे शाखा मध्यवर्ती, १ व २ पथके
अमली पदार्थविरोधी, गुंडाविरोधी पथक

गुन्हे शाखा पथके ऑनरोड

३१ डिसेंबरनिमित्त ‘स्टॉप अॅण्ड रार्च’ कारवाईचे आदेश दिले आहेत. क्रूजचा वापर कुठेही होणार नाही, व्यासंदर्भात दक्षता घेण्याच्याही सूचना पथकांना केल्या आहेत. चौकाचौकांत बंदोबस्त नेमून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत नियंत्रण कक्षात वेळोवेळी ‘अपडेट’ घेण्यात येतील.

संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...