नाशिक | भारत पगारे | Nashik
नाशिकमध्ये सन २०२६-२७ दरम्यान होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela) कृत्रिम बुद्धिमत्तेबर (एआय) आधारित ‘इंटिग्रेडेट कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर’ (आयसीसीसी) कार्यरत केले जाणार आहे. संशयित गुन्हेगार व हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासह गर्दा नियंत्रणासाठी त्याचा वापर होईल. त्यासोबतच शहरात दोन हजार ठिकाणी एकूण पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवले जाणार आहेत, गत कुंभमेळ्यात केवळ १७२ ठिकाणी ६३० कॅमेरे बसवण्यात आले होते. यामुळे चाहनतळांत सीसीटीव्ही कॅमेरे अगदीच कमी होते. सोबतच सीसीटीव्ही आणि ध्वनिक्षेपकाद्वारे शहरात सूचना देण्याची पडताळणीही झाली आहे. सिंहस्थापर्यंत शहरातील सर्व कॅमेरे जोडून, ‘एआय’चा वापर करण्यासाठी नाशिक पोलीस प्रयत्नशील असून कामे बुद्धपातळीवर सुरू आहेत.
प्रयागराजमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अभ्यास दौ-यानंतर नाशिक पोलिसांच्या सिंहस्थ कक्षाने आवश्यक बाबींनुसार कार्यवाही सुरू केली आहे. नाशिक पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा दौरा केला. त्यामध्ये धार्मिक स्थळे, पर्वणीच्या ठिकाणांसह गर्दी नियंत्रण, बंदोबस्त, पोलिसिंग, रस्ते वाहतुकीसह कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास केला. दरम्यान, सिंहस्थासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ११०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यात अपेक्षित चौक्या, सीसीटीव्ही, बायरलेस यंत्रणा, बाँच टॉवर, ड्रोन कॅमेरे, अतिरिक्त मनुष्यबळाच्या खर्चासह इतर तंत्रसामुग्रीचा समावेश आहे. यासह ‘एआय’ चापराचे सॉफ्टवेअर आणि यंत्रसामुग्रीसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. कुंभमेळ्यानंतरही शहरात आवश्यकतेनुसार पोलीस चौक्या उपलब्ध होतील. ४०० कोटी रुपये खर्च करून दोन हजार ठिकाणी पाच हजार सीसीटीव्ही बसवण्यासोबतच एक हजार बॉडी कॅमेरा व चाहनांवरील १०० कॅमेरा आवश्यक असल्याचा आराखडा पोलिसांनी मांडला आहे. त्यातील काही सीसीटीव्ही शहरात कायमस्वरुपी ठेवले जाऊ शकतात.
असा होईल वापर
प्रयागराजच्या ‘आयसीसीसी’ मध्ये सर्व कॅमेऱ्यांचा फिड पोलिसांना (Police) मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांचा रंग व उंची नोंदवल्यास ‘एआय’द्वारे संबंधित व्यक्तीचे फोटो लगेचच मोठे होतात. त्यामुळे गर्दीतून अचूक व्यक्ती हेरता येतो. संबंधित व्यक्तीच्या फोटोवर क्लिक केल्यास जवळच्या सेक्टर किंवा पोलीस चौकीची माहिती येते. तेथे त्वरित फोनद्वारे किंवा ध्वनिक्षेपकाद्वारे संपर्क साधला जातो. या कार्यपद्धतीद्वारे संशयित व हरवलेल्यांना शोधणे शक्य आहे. वासह एकाच ठिकाणी किती गर्दी आहे, कोणत्या ठिकाणी गर्दी रोखायची, याचीही माहिती मिळते, नाशिक पोलिसांच्या ‘कमांड कंट्रोल रूम’मध्ये सध्या ८०० पैकी २५० कॅमेऱ्यांचा फिड आहे.
यंदा चार कोटी भाविक येणार!
शहरासह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मत कुंभमेळ्यात शहरात ८० लाख भाविक पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. तर येत्या कुंभमेळ्यात जगभरातून अंदाजे तीन ते चार कोटी भाविक, पर्यटक येणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांना मनुष्यबळासह सीसीटीव्ही, पोलीस चौक्या, बॅरेक्स, वॉच टॉवर्स, बल्ली स्टील बेरेकेडिंग, पी. ए. सिस्टीम, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बी.डी.डी.एस), ड्रोन कॅमेरा, वाहने, पोलिसांना फूड पॅकेटस् आदी महत्त्वाची साधनसामुग्री लागणार आहे.
पोलिसांच्या आराखड्याला काहीशी कात्री!
आगामी कुंभमेळ्यात शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकान्यांकडे १ हजार ११२ कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा सादर केला आहे. प्रामुख्याने सीसीटीव्ही, पोलीस चौक्या बॅरेक्स, बेरिकेडिंग, वॉच टॉवर, वाहनांसह इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. २०१५ मधील कुंभमेळ्यासाठी पोलिसांनी सुमारे ५९ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च केला होता. त्या तुलनेत यंदा सुमारे २० पट वाढीव खर्चाचा आराखडा आहे. मात्र या आराखड्याला विभागीय व उबस्तरीय समिती आवश्यक खर्च वगळता इतर कामांच्या निधीला कात्री लावणार आहे.
कुंभमेळ्यात ‘एआय’ संलग्नीत सीसीटीव्ही कार्यरत असतील, पोलीस चौक्या, वॉच टॉवर, बॅरेक्स दुरुस्ती नव्याने उभारले जातील. त्यामुळे कुंभमेळा झाल्यानंतर यातील बहुतांश उपकरणे, साधनसामुग्री नाशिक शहरासाठी कायमस्वरुपी राहू शकेल. काही साहित्य राज्यभरात आवश्यकतेनुसार पाठवले जाईल.
चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, मुख्यालय
मुद्दे
एआयद्वारे भाविकांना १२ भाषांत कुंभमेळ्याची माहिती व सूचना
प्रयागराजमध्ये नदीचा घाट १२ कि.मी.चा नाशिकमध्ये दीड कि.मी.
आगामी सिंहस्थात तंत्रज्ञानासह ‘एआय’ वर आधारित पोलिसिंग
नाशिकमध्ये ‘कमांड कंट्रोल सेंटर’ (सीसीसी) कार्यरत, कॅमेऱ्यांचा फिड सुरू
सीएपीएफ, सीआरपीएफ आदी २५ हजारांचा वाढीव फौजफाटा लागणार
पी.एस. सिस्टिम गर्दीवर नियंत्रणासाठी प्रभावी
बॉम्ब शोधक नाशक उपकरणांसाठी १० कोटी
प्रथमच होणार होन कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर
१०० निरीक्षण मनोरे उभारणार