Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

उद्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी, २१ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्याचे आणि देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठा थांबविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कामांच्या पार्श्वभूमीवर रविवारी, २२ जून रोजी सकाळच्या सत्रात पाणी कमी दाबाने पुरवण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकमधील जलशुद्धीकरण केंद्रे आणि बुस्टर पंपिंग स्टेशनमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांतर्गत स्मार्ट सिटी कंपनीद्वारे नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमीटर बसवले जात असून, त्यासाठी शटडाऊन आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

शहरात पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी स्काडा प्रणाली बसवण्याचे काम देखील सुरू आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि बसस्थानक परिसरातील विविध देखभाल कामे या दरम्यान पार पडणार आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्र सहकार्य करावे, असे आवाहन. महानगरपालिकेने केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य – विजय...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जादायी आणि...