Saturday, September 5, 2026
HomeनाशिकNashik Cold Weather : पुन्हा हुडहुडी! नाशिकचा पारा ८.१ अंशांवर

Nashik Cold Weather : पुन्हा हुडहुडी! नाशिकचा पारा ८.१ अंशांवर

नाशिक | Nashik

- Advertisement -

शहरासह जिल्ह्यात (District) थंडीचे (Cold) पुन्हा दमदार आगमन झाले असून आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कडाका वेगाने वाढू लागला आहे. तीन दिवसांत शहरात किमान तापमानाचा पारा ४.३ अंशांनी घसरला आहे. मंगळवारी (दि.९) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ९.३ तर बुधवारी (दि.१०) ८.१ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातून (North India) एकापाठोपाठ मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंझावात प्रकोपामुळे थंड वारे राज्याकडे झेपावत आहेत. यामुळे थंडीची तीव्रता वाढवण्यासाठी अनुकूल अशी वातावरणीय स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह कोकणाचा भाग वगळता राज्यात सर्वच शहरे गारठण्यास सुरुवात झाली आहे, असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी नाशिकमधील निफाड (Niphad) येथील गहू कृषी संशोधन केंद्रात या हंगामातील सर्वात नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस इतके राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची (Temperature) नोंद झाली.

गत दहा दिवसांतील तापमान (अंश से.)

सोमवार (दि ०१ डिसेंबर)१०.०
मंगळवार (दि ०२ डिसेंबर)१०.३
बुधवार (दि ०३ डिसेंबर)१०.१
गुरुवार (दि ०४ डिसेंबर)११.८
शुक्रवार (दि ०५ डिसेंबर)१२.००
शनिवार (दि ०६ डिसेंबर)११.५
रविवार (दि ०७ डिसेंबर)१२.६
सोमवार (दि ०८ डिसेंबर)१०.३
मंगळवार (दि ०९ डिसेंबर)९.३
बुधवार (दि १० डिसेंबर)८.१

ताज्या बातम्या

चांदशी

Nashik News: चांदशी रोडवर बॅरिकेड तोडून कार आत घुसली

0
नाशिक : प्रतिनिधीचांदशी (Chandshi Road) रोडवरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या (Road Work) ठिकाणी बॅरिकेडिंग आणि सूचना फलक तोडून कार आत (Car Accident) घुसल्याची घटना...