Saturday, July 27, 2024
Homeनाशिक30 व्या नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवास प्रारंभ

30 व्या नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवास प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी

गुरुकृपा प्राप्त कलानिपुन प्रत्ययकारी अविष्कार क्षमता असलेले ताज्या दमाचे कथक कलाकार आणि सुजान अभिरुची संंपन्न रसीक, असा सुरेख संगम आज नटराज पंंडीत गोपीकृष्ण महेात्सवाच्या शुभारंंभ प्रसंंगी जुळुन आला.श्रुती देवधर, मृदुला तारे व अविनव मुखर्जी या युवा नर्तकांंच्या नृत्याविष्कारने महोत्सवााचा उत्साहात प्रारंंभ झाला.

- Advertisement -

कथक नृत्याचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संवर्धनाचा ’ध्यास’ घेतलेली कीर्ती कला मंदिर ही नृत्य संस्था गेली तीन दशके गुरु नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचेे आयोजन करते. या नृत्योत्सवामुळे दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांच्या कलेला दाद देणारा एक सुजाण रसिक तयार झाला.

शनिवार (दि.२६) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात या कार्यक्रमााचा शुभारंभ रघुवीर अधीकारी, श्री. राठोड, व सोनाली महाजन यांच्या हस्ते झाला. झाला.कीर्ती कला मंदिराच्या ज्येष्ठ नृत्यांगना आदिती पानसे त्यांच्या शिष्या श्रुती व मृदुलाने त्रितालाचा आकृतीबंध साकारला, थाट, आमद, तोेडे , परण, चक्रदार, लडी या अभीव्यक्त होणार्‍या नृत्यकृती विलोभनीय साकारल्या.

गतीतील स्थिरता व स्थिरतेतील गती या दोन्हींचा प्रत्यय यावेळी आला.जयपुर घाराण्याच्या दमदार नृत्याचे दर्शन मुखजीर्र्ने ेघडवीले.त्याने कालीया आणि कंंस वध या दोन्ही लिलावरील रचना पेश केल्या. गुरु शिष्याच्या अतुट रेशम बधाचे अनुभव पंंं.रोहीनी भाटे यांच्या चित्रफीतीतुन निलीमा अराध्ये यांंनी उलगडुन दाखवीला. पियु आरोळे यांंनी सुत्रसंंंचालन केले.अशीष रानडे यांचे गंभीर स्वर व व इश्वरी दसककर यांचा मिलाप या मनेाहेरी नृत्याकृती मुळे वातावरण प्रसन्न झाले.

प्रथम पुष्पाचा समारोप तेरी गती अगाध, वरणीन जात मोहे या नारायण स्तुतीने झाला. साथसंगत – तबला – चारुदत्त फडके, प्रदीप लवाटे, बल्लाळ चव्हाण , सत्यप्रकाश मिश्रा. गायन – रवींद्र साठे, त्यागराज खाडीलकर, श्रीरंग टेंबे, नागेश आडगावकर, विनय रामदासन, मृण्मयी पाठक आणि ईश्वरी दस्सकर सतार – अनिरुद्ध जोशी , बासरी – सुनील अवचट हार्मोनियम – चिन्मय कोल्हटकर, श्रीरंग टेंबे , ईश्वरी दसककर ,अवनी गद्रे यांनी दिली.

आज औरंगाबादकर सभागृह आणि २८ रोजी महाकवी कालिदास कला मंदिर येथे दररोज सायंकाळी ६ वाजता हा नृत्य उत्सव होणार आहे. अभिजात शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरेची जपणूक करतानाच प्रयोगशीलता आणि नाविन्याचा ध्यास यांचा सुरेख मेळ या महोत्सवात घतला जाणार आहे.

रविवारी ’इटरनल बाँड’ औरंगाबादकर सभागृहात विदुषी गुरु रोहिणीताई भाटे यांच्या नृत्य प्रवासाचां दुर्मिळ आणि असामान्य माहितीपट त्यांच्या शिष्या नीलिमा आध्ये यांच्या प्रात्यक्षिकासह बघण्याचा लाभ नृत्य प्रेमींना, नृत्य अभ्यासकांना घेता येणार आहे.

दिनांक २८ रोजी नृत्य उत्सवाचा समारोप डॉ. टीना तांबे यांचे एकल नृत्य आणि गुरु रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणार्‍या ’द व्हायब्रन्स’ ह्या नृत्य संरचनेने होणार आहे.’ जल्लोष चैतन्याचा रेखाताई नाडगौडाच्या संकल्पनेतून साकारणारी ही नृत्याकृती कीर्ती कला मंदिराच्या यशस्वी नृत्यांगना पेश करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या