Tuesday, April 29, 2025
Homeक्राईमNashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली गळा...

Nashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली गळा दाबून हत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील जेलरोड परिसरात (Jail Road Area) असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपला आठ वर्षाचा मुलगा (Son) गणेश याचा गळा दाबून खून (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबतचे अधिक माहिती अशी की, आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जेलरोड मंगलमूर्ती नगर येथे राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपल्या राहत्या घरी दारूच्या नशेत आपला आठ वर्षाचा मुलगा गणेश याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने गणेश याचा मृतदेह (Dead Body) एका पोत्यात टाकला व सासू व बायको ज्या ठिकाणी राहते त्या जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी या ठिकाणी घरामध्ये मृतदेह गोणीसह टाकून तो पळून गेला.

या घटनेनंतर पत्नी व सासूने आरडाओरड करून पळून जाणाऱ्या सुमितला पकडण्याचा प्रयत्न केला.सुमित पुजारी व त्याची पत्नी या दोघांमध्ये सतत भांडण होत होते. भांडणाला कंटाळून त्याच्या पत्नीने माहेरी येण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर रागाच्या भरात सुमित पुजारी (Sumit Pujari) याने आपला मुलगा गणेश याचा गळा आवळून खून केला. गणेश हा जन्मापासून अपंग असल्याचे समजते.

दरम्यान, सदरची घटना समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक फुलपगारे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर संशयित (Suspected) आरोपी सुमित पुजारीला ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सुमित पुजारी याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. मयत गणेश हा सर्वात लहान होता. तसेच तो नवीन मराठी शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : चाळीस घरफोड्या करणारे ताब्यात; उपनगरातील चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी पोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या दुचाकीवरून नाशिकमध्ये (Nashik) येत उपनगर भागातील (Upnagar Area) माजी नगरसेवक सुनील बाबुराव गोडसे...