Thursday, July 30, 2026
Homeक्राईमNashik Crime : दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा हल्ला; शाळेसमोरच घडली घटना

Nashik Crime : दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा हल्ला; शाळेसमोरच घडली घटना

नाशिक | Nashik

शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर (Nashik District Sessions Court) असलेल्या न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट येथील शाळेच्या परीक्षा केंद्रावर आज (बुधवारी) दुपारच्या सुमारास एका दहावीच्या विद्यार्थ्यावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित विद्यार्थी (Student) दहावीचा पेपर देण्यासाठी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या परीक्षा केंद्रावर आला होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर तो शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या १० ते १५ जणांच्या अज्ञात टोळक्याने त्या विद्यार्थ्याला गाठत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. तर हल्ल्यानंतर टोळक्याने तेथून पळ काढला.

दरम्यान, या घटनेनंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, भद्रकाली पोलीसांनी (Bhadrakali Police) घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच संशयित आरोपींची ओळख पटवण्याचे काम असून, गुन्हा दाखल काम करण्याचे काम सुरु आहे.

ताज्या बातम्या