Sunday, November 24, 2024
Homeक्राईमNashik Crime : रडणे थांबवण्यासाठी बाळाचा गळा दाबला; अल्पवयीन भावाचे कृत्य

Nashik Crime : रडणे थांबवण्यासाठी बाळाचा गळा दाबला; अल्पवयीन भावाचे कृत्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

११ वर्षीय मावसभावाने अवघ्या दोन वर्षे वयाच्या भावास (Brother) माती खाल्ल्याच्या वादातून तोंडावर ठोसे मारले. यानंतर लहानगा भाऊ रडायला लागल्यावर हे रडणे थांबविण्यासाठी मावसभावाने त्याचा गळा दाबून ठेवल्याने बाळाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील लेंडीनाला भागात घडली आहे. शवविच्छेदन अहवालातून ही खळबळजनक बाब घटनेनंतर ११ दिवसांनी उघड झाली असून, अकरा वर्षीय मावसभावावर सदोष मनुष्यवधाचा (Defective Homicide) गुन्हा आडगाव पोलिसांत दाखल झाला आहे. चिमुकला रडूलागल्याने त्यास शांत करण्यासांठी त्याचा गळा दाबला आणि श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वीर बोके (वय २, रा. लेंडी नाला, आडगाव शिवार) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) अंमलदार देवरे यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव शिवारातील (a) लेंडीनाला परिसरामध्ये मोलमजुरीसाठी आलेले लोखंडे आणि बोके कुटुंबीय राहतात. ९ तारखेला दोन्ही कुटुंबीय शेतीच्या कामावर मजुरीला गेले होते. तर घरी दोघे मावसभाऊ होते. मृत वीर हा आधीच आजारी होता. त्यातच तो (दि. ९) दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना माती खात होता. ही बाब त्याचा अकरा वर्षीय मावसभावाने पाहिली.

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

त्याने बीरला तोंडावर व इतरत्र मारले. मार बसल्यावर वीर हा रडत रडत घराबाहेर (House) असलेल्या खडीवर आला आणि तेथेच पडला, त्यामुळे वीर अधिकच रडू लागला. तो जास्तच रडत असल्याने ११ वर्षीय भावाने त्यास शांत करण्यासाठी पुन्हा मार दिला.त्याचे रडू थांबत नसल्याने त्याने बाळाचा गळा दाबला. काही मिनिटांमध्ये वीर निपचित पडला. तो हालचाल करीत नसल्याने अल्पवयीन घाबरला. त्याने शेजारी राहणाऱ्यांना आवाज दिला. कुटुंबीयही घरी आले. बाळाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले असता, त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

शवविच्छेदनातून खुलासा

मृत वीरच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नव्हते. यानंतर कायदेशिर पद्धतीचा भाग म्हणूण शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा फॉरेन्सिक एक्स्पर्टने धक्कादायक निरीक्षक नोंदविले. या अहवालात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जो अभिप्राय दिला, त्यात वीरचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर गळा दाबून झाल्याचे उघडकीस आले. याची माहिती आङगाव पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, अल्पवयीन मुलास विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी त्याने त्यादिवसाचा घटनाक्रम सांगितल्यानंतर वीरच्या मृत्यूमागील कारण समोर आले. याप्रकरणी भावाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक उपनिरीक्षक मयूर निक्म हे करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या