नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूरच्या (Satpur) श्रमिकनगर परिसरातील (Shramiknagar Area) पार्थ पॅलेसच्या शंभर फूटी रस्त्यालगत बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून २२ वर्षीय युवकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश उर्फ भैय्या वानखेडे (वय २२) असे मृताचे नाव असून तो श्रमिकनगर येथे राहत होता. त्याचे मूळ गाव सटाणा आहे. वानखेडे कंपनीतून काम करून रात्री घरी परतत असताना काही टवाळखोर (Criminal) गुंडांनी त्याला रस्त्यात थांबवले.
यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या वानखेडे याच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यावेळी काही क्षणांतच तो गतप्राण झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातील (Nashik City) गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे.




