Saturday, January 10, 2026
Homeक्राईमNashik Crime : ४३ लाखांच्या ५२ दुचाकी जप्त

Nashik Crime : ४३ लाखांच्या ५२ दुचाकी जप्त

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) बाहेरील जिल्ह्यातून मोटार सायकली चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून चोरलेल्या मोटार सायकली विकणाऱ्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) पर्दाफाश केला असून संशयितांकडून सुमारे ४३ लाखाच्या ५२ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांच्या हस्ते दुचाकी मालकांना त्यांच्या दुचाकी परत केल्या, १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान नाशिकरोड न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लतिफ गुलाब शेख यांची हिरो होंडा कंपनीची एम एच १५ डी जी २६६७ अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

- Advertisement -

नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) याची नोंद करण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असतांना गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पवार यांना सिन्नर फाटा येथील सिटी लिंक डेपो परिसरात काही युवक चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहा, पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी सागर आडने, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, आदींनी सापळा रचून संशयित यश दीपक डावरे (३०, पुष्पक अपार्टमेंट, मंगलमूर्तीनगर, जेलरोड), जावेद इस्माईल शेख (२४ न्यू स्टेशन वाडी, देवळाली कॅम्प), मुस्तफा मोहम्मद शेख (२२ सात अळी, देवळाली कॅम्प) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता चार बनावट आर सी बुक मिळून आले. मोटार सायकलीचा नंबर देखील खोटा असल्याचे चौकशीत दिसून आले. दरम्यान त्यांनी एका निर्जन स्थानी ठेवलेल्या चोरीच्या ५२ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून तिघाही संशयित (Suspected) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

मालकांना दुचाकी परत

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारात चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकी संबंधित दुचाकी मालकांना कल्पना देण्यात आली आता अनेक दुचाकी मालक आले होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांच्या हस्ते कागदांची पडताळणी करून दुचाकी मालकांना दुचाकी परत करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपयुक्त किशोर काळे, सहा, पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या