Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमNashik Crime News : बँक व्यवस्थापकाला ४० लाखांचा गंडा

Nashik Crime News : बँक व्यवस्थापकाला ४० लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगचे आमिष; चाैघांचे दीड काेटी रुपये उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शेअर ट्रेडिंगचे (Share Trading) अमिष दाखवून नाशकात (Nashik) आतापर्यंत अनेक अधिकारी, व्यावसायिक, उद्याेजक, नेकरदार व अभियंत्यांची तब्बल १५ ते २० काेटी रुपयांची आर्थिक फसवणूक सायबर चाेरट्यांनी केली आहे. त्यातच आता पुन्हा शहरातील एका बँकेच्या ब्रान्च मॅनेजरसह अन्य नाेकरदार व व्यावसायिकांकडून सुमारे १ काेटी ३३ लाख रुपये उकळून गंडा घातला आहे. त्यानुसार अनाेळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर थेट दरमहा ३० ते ४० हजार रुपयांच परतावा आणि वनटाईम इन्व्हेस्टमेंटमधील रक्कम तिप्पट करुन देण्याचे सांगून हा गंडा घालण्यात आला आहे. 

हे देखील वाचा : संपादकीय : ५ सप्टेंबर २०२४ – आरोग्याची गुरुकिल्ली

शहरातील एका बँकेत मॅनेजर (Bank Manager) असलेल्या व्यक्तिसह अन्य तिघा तक्रारदारांनी सायबर पाेलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद नाेंदविली आहे. त्यानुसार बँक मॅनेजरकडून ४५ लाख रुपये उकळून ५ लाखांचा परतावा देत उर्वरित पैसे परत न करता फसवणूक केली. तसेच, अन्य तिघांकडून ९३ लाख रुपये घेत फसवणूक (Fraud) केली आहे. सायबर चाेरट्यांनी २२ मार्च ते ३१ जुलै २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत बँक मॅनेजरसह अन्य तिघांना व्हाट्स ॲपमार्फत संपर्क केला. तसेच शेअर ट्रेडींगच्या विविध सोशल मिडीया प्लॅटफार्मवरील जाहिराती दाखविल्या. यानंतर बनावट कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्वाॅईन होण्यास भाग पाडले. साेबतच शेअर ट्रेडिंग, स्टाॅकबद्दल वेळोवेळी माहिती देत विश्वास संपादन करुन संशयितांनी वेगवेगळ्या बाेगस कंपनींच्या बनावट ट्रेडींग प्लॅटफार्मवर खाते उघडण्यास प्रवृत्त केले.

हे देखील वाचा : तापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर

याचवेळी विविध संशयास्पद ॲपवर विविध कंपन्याचे स्टाॅक आणि ‘आयपीओ’ घेण्याकरीता लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली. साेबतच विविध बँकेच्या खात्यांवर बँक मॅनेजरला ४४ लाख ४५ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेच्या अकाऊंटमधून भरण्यास भाग पाडले. तर, बँक मॅनेजरला संशय येऊ नये यासाठी वरील कालावधीत एकूण ५ लाख ४८ हजार रुपयांचा परतावा देखिल दिला. मात्र, उर्वरीत ३९ लाख ४६ हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने इतर तिघांची ९३ लाख रुपये उकळून फसवणूक केली आहे.

चौकट

ऑनलाईन आर्थिक फसवणूक (Online Fraud) झाल्याने पाेलिसांनी फसवणुकीची रक्कम वर्ग झालेले बँकवॉलेट, खाते व संशयित मोबाईल धारकांविरूध्द आयटी ॲक्टनुसार गुन्हा नाेंदविला आहे. अशा फसवणुका हाेऊ नयेत, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यात अनोळखी व्यक्तीचे व्हॉट्सॲप व मोबाईल कॉल घेणे टाळावे.  सायबर गुन्हेगारांच्या कोणत्याही धमकीला, दबावाला व आमिषाला बळी पडू नये, थेट पोलिसांत तक्रार करावी. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. स्वतःची माहिती शेअर करू नये. शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीचा विचार असला तर आधीच सायबर पाेलीस ठाण्यात जाऊन माहिती घ्यावी.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या