नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कंपनीचे (Company) बनावट कागदपत्र (Fake Document) तयार करून ग्राहकांकडून लाखो रुपये जमा करून कंपनीची फसवणूक (Fraud) करणाऱ्या कर्मचाऱ्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप तुळशीदास इंगळे (वय ३१ वर्षे, धंदा खासगी नोकरी, रा. १९ भाग्यदिप बंगलो, चंपानगरी, कॅनलरोड, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नरेंद्र चांदकुमार पहिलजानी (टेरिटरी मॅनेजर, रा. फ्लॅट नं. १०२, कृष्णापार्क, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) याने जून २०२५ ते अद्याप इंगळे यांच्या कंपनीत प्रकाश किरण बंगला, जाणता राजा कॉलनी रोड, स्वामी समर्थ कें द्राजवळ, ड्रीमकॅ सल बिल्डींगच्या मागे, पंचवटी, नाशिक येथील ब्रँचमध्ये बनावट कागदपत्रे, ई मेल आयडी, शाळेचे लेटर हेड तयार करून ग्राहकांकडून ३७ लाख ९५ हजार ८७६ रुपये इतकी रक्कम जमा करून ती स्वतःच्या फायद्याकरता वापरून कंपनीची फसवणूक केली.
दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.





