नाशिक | प्रतिनिधी | Nashik
हरविलेला माेबाईल सापडतांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबांत वाढलेल्या वादाच्या तणावातून दुसऱ्या कुटुंबातील तरुणाने (Youth) पहिल्या कुटुंबाकडून धमकी मिळताच विषप्राशन करुन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना पंचवटीतील वाघाडीत घडली असून घटनेस तरुणाच्या हरविलेल्या माेबाईलचे निमित्त मात्र झाल्याचे समाेर आले आहे. विशेष म्हणजे हरविलेला माेबाईल (Mobile) काही तासांनी परिसरात आढळून आला आहे. या प्रकरणात दाेन कुटुंबातील वाद वाढून ताे पाेलीसांपर्यंतही (Police) पाेहाेचला. त्यानंतर दाेन्ही कुटुंबावर परस्परविराेधी ‘एनसी’ ची कायदेशिर कारवाईची प्रक्रिया सुरु असतानाच या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून तपास सुरु झाला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; निफाड, पारनेरचा उमेदवार ठरला
गाैरव रमेश पाटील (वय २७, रा. मजूरवाडी, संजयनगर, वाघाडी) असे मृताचे नाव आहे. ताे माेलमजुरी करण्यासह अविवाहित हाेता. याबाबत गाैरवची आई वंदना रमेश पाटील यांनी संशयित समीर शहा, मेहनत समीर शहा, हसीना शेख व हसन शेख(सर्व रा. मजूरवाडी) या शेजाऱ्यांविराेधात ‘मुलास आत्महत्येस प्रवृत्त’ केल्याची फिर्याद पंचवटी पाेलिसांत (Panchvati Police) दाखल केली आहे. गाैरव हा १९ ते २१ ऑक्टाेबर २०२४ या कालावधीत कधीतरी रात्रीच्या वेळी मजूरवाडी येथील घरासमाेरुन जात असताना, अचानक त्याचा माेबाईल हरविला किंवा गहाळ झाला. काही वेळाने हा माेबाईल शाेधण्यासाठी गाैरव परिसरात आला असता, त्याने शेख कुटुंबाकडे ‘माझा माेबाईल तुम्हाला सापडला का’ अशी विचारणा केली. मात्र, शेख कुटुंबाने नकार दिला.
हे देखील वाचा : Nashik Political : आम्ही राजीनामे देऊ; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य
त्यानंतर याच गाेष्टीमुळे शाब्दिक वाद झाले. हा वाद वाढत गेला. त्यातून पााटील व शेख कुटुंबात हाणामारी झाली. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करुन वाद तात्पुरता मिटविला. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी दाेन्ही कुटुंब (Family) समाेरासमाेर आले. वाद इतका वाढला की, कुटुंबांनी परस्परविराेधी ‘एनसी’ नाेंदविल्या. दाेन्ही कुटुंबांच्या एनसीवर कार्यवाही सुुरु असतानाच, शेख कुटुंबातील सदस्यांनी गाैरवला काहीतरी धमकी दिली. त्यामुळे ताे घाबरला आणि तणावाखाली आला. यानंतर गाैरव (दि. २१) निमाणीतील सूर्या आर्केडजवळ आला.
हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक पश्चिमची लढत विविधरंगी; प्रबळ दावेदारांमुळे उमेदवारांचा लागणार कस
त्याने गव्हाच्या काेठीत ठेवले जाणारे ‘सेल्फाॅस’ ही विषारी पावडर सेवन केली. ताे विव्हळत पडला असता गाैरवच्या भावाच्या एका मित्राने त्याला गंभीर अवस्थेत पाहून पाटील कुटुंबाला कळविले. त्यांनी त्याच अवस्थेत त्याला घरी नेले. गाैरवने घराच्या पायऱ्या चढून घरात काही मिनिटे व्यतित केली. मात्र, तेव्हात त्याला अति अत्यवस्थ वाटू लागल्याने त्याच्या ताेंडातून फेस आला. त्यानंतर कुटुंबाने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान काही वेळाने त्याला मृत घाेषित करण्यात आले. तपास पाेलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करत असून संशयित (Suspect) शेख कुटुंबाची चाैेकषी केली जात आहे. तपासानंतर जे निष्पन्न हाेईल, त्यानुसार अटकेची कारवाई हाेणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा