नाशिक | Nashik
शहरात खासगी सावकारांचा (Private lender) जाच वाढताच असून पूर्वी गुन्हे नोंद होऊनही कर्जदार कुटुंबे सावकारीतून मुक्त होण्यात अपयशी ठरली आहेत. आता देवळाली कॅम्प आणि उपनगर पोलीस ठाण्यांत एका महिलेसह पुरुषावर अवैध सावकारी केल्याचा गुन्हा सहकारी संस्थांचे उपनिबंधक तथा सावकारी नियंत्रण अधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आला आहे. तर उपनिबंधक कार्यालयाने दोन्ही सावकारांच्या घरांची झडती घेतली असता तेथे आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, सह्या केलेले कोरे धनादेश (Check) आढळून आले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : तीन मुलांना विहिरीत ढकलून खुनाचा प्रयत्न
राजू लक्ष्मण देशमुख (रा. देशमुख वाडा, विहितगावरोड, देवळाली गाव) आणि साधना खान (रा. नाडकर्णी बंगला, राममंदिराजवळ, दे. कॅम्प) अशी संशयित खासगी सावकारांची नावे आहेत. याबाबत सावकारांचे उपनिबंधक कार्यालयातील (Office of the Deputy Registrar) शैलेंद्र पोतदार यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्या कार्यालयात खासगी सावकारीला कंटाळलेल्या कर्जदारांनी तक्रार नोंदवली होती. या तक्रारींची दखल घेऊन कार्यालयाने सावकारीचे स्वरूप पाहून थेट गुन्हा दाखल करण्याची तयारी केली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : अटकेची भीती दाखवून फसवणूक
यानंतर देवळाली कॅम्प व उपनगर पोलिसांच्या (Deolali Camp and Upnagar Police) मदतीने तालुका उपनिबंधक कार्यालयातील (Office) अधिकाऱ्यांनी दि. १९ रोजी अचानक राजू देशमुख व साधना खान या खासगी सावकारांचे घर गाठून झडती घेतली तेव्हा देशमुखच्या घरात अर्जदारासह विविध व्यक्तींचे स्वाक्षरी केलेले ३५ धनादेश, ३० उसनवार दस्त/नोटरी व कच्च्या आकडेवारी, नांव नोंदीच्या दोन डायरी आढळल्या. त्यानुसार संशयित अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर
साधना खानच्या घरात नोटरी, साठेखत
साधना खानच्या घरात विविध व्यक्तींचे स्वाक्षरी असलेले २२ धनादेश, सात नोटरी खरेदीखत, साठेखत, दोन हिशेब नोंदी असलेल्या डायरी आढळल्या. त्यानुसार खान ही अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी सावकारांचे उपनिबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाने गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दे. कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस. बी. आहिरे व उपनगरचे उपनिरीक्षक विशाल सपकाळे करत आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : परिवहन आयुक्तांसोबत आरटीओ कर्मचारी संघटनेची चर्चा फिस्कटली
संशयितांच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता
दोन्ही सावकारांनी अनेक तक्रारदार, कर्जदारांना २ लाख रुपयांच्या मोबदल्यात ४ ते ६ लाख रुपये वसूल केल्याचे समोर येत आहे. दिलेल्या रकमेची व्याजदर आकरणी ही ७ ते ८ टक्के असून आता संशयितांच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. दोघांच्या घरातून मिळालेल्या आर्थिक नोंदी, कागदपत्रे, डायरीनुसार तपास सुरू झाला असून अनेकांची मालमत्ता संशयितांनी गहाण ठेऊन घेतल्याचे कळते आहे. दोघांना लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा