Saturday, November 23, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सव्वा लाखांच्या माेबदल्यात उकळले आठ लाख; गुन्हा दाखल

Nashik Crime News : सव्वा लाखांच्या माेबदल्यात उकळले आठ लाख; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओळखीच्या माध्यमातून खासगी सावकाराकडून व्याजाने सव्वा लाख रुपये घेऊन त्यामाेबदल्यात तब्बल ८ लाख रुपये उकळणाऱ्या सावकारी कुटुंबावर अखेर गंगापूर पाेलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा नाेंद झाला आहे. या कर्जदार व्यक्तीसह कुटुंबास सावकाराने जीवे मारण्यासह ‘तुझ्या पत्नीचा मी सांभाळ करेन’, असे म्हटल्याने कर्जदार मंगळवारी दुपारी थेट पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या दालनात पाेहाेचला. त्याने आपबिती सांगितल्यावर आयुक्तांच्या आदेशाने संशयित खासगी सावकार सुनिल महाजन, त्याची पत्नी ज्याेत्स्ना आणि दीपक महाजनसह त्याच्या चुलत सासऱ्यावरही कार्यवाही करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ – खा.कोल्हे

दशरथ पंडीत साबळे (वय ४४, रा. रामनगर, गंगापूर राेड) यांनी याबाबत खंडणी व अवैध सावकारी अधिनियमान्वये मंगळवारी(दि. २४) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दशरथ साबळे हे पत्नी व दाेन मुलींसह वास्तव्यास असून ते हाॅटेलात वेटर आहेत. मार्च २०१६ मध्ये त्यांना आर्थिक विवंचना भासल्याने त्यांनी ताेंडओळखीतील सुनील महाजन यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले. दरम्यान, या व्याजाची आकारणी करुन सन २०१६ पासून आजतायगत तब्बल ८ लाख ४५ हजार रुपये राेख व ऑनलाइन (Onilne) स्वरुपात वसूल केले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ

तर आता याच एक लाख ३० हजारांच्या व्याज वसूलीनंतरही महाजन याने, पुन्हा आठ लाख रुपये बाकी असून ते द्यावे लागतील असा तगादा लावून चाैघेही संशयित साबळे यांच्या घरी आले. त्यांनी वारंवार घरी येऊन शिवीगाळ केली आणि पैसे न दिल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. गंगापूर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुशील जुमडे यांच्या सूचनेने पाेलीस उपनिरीक्षक माेतीलाल पाटील तपास करत आहेत. तर, संशयित सुनील महाजन हा पोलिस असल्याचा संशय असल्याने सखोल तपासाचे आदेश आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) नावे ७२७६०१९७६६ क्रमांकावरुन साबळेंना धमक्या दिल्या जात असून हा क्रमांक एका वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नावे नोंद असल्याचे समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या