Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : माजी नगरसेवक पुत्रासह दोघांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा

Nashik Crime : माजी नगरसेवक पुत्रासह दोघांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळाली कॅम्प येथील लॅमरोडवरील जागेच्या न्यायप्रविष्ठ वादातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात एका संशयिताचे नाव टाकण्यात आले. मात्र हा संशयित घटनेच्या वेळीपूर्वीच दाखल एका गंभीर गुन्ह्यात कस्टडीमुळे मध्यवर्ती कारागृहात होता. त्यामुळे तो घटनास्थळी नसतानाही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांचा मुलगा प्रताप चुंभळे याच्यासह इतर दोघांविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Case of Atrocity) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

यश सतीष गरुड (२७, रा. कॅनल रोड) याच्या फिर्यादीनुसार, तो उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक (Arrested) झाल्यानंतर १४ ऑगस्ट ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. प्रताप चुंभळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पवन पवार, विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे, नाना पगारे व इतरांविरोधात दरोडा टाकून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, सीसीटीव्ही, टीव्ही असा ऐवज हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, ही दरोड्याची (Robbery) घटना २२ नोव्हेंबरला बेलतगव्हाण येथे घडल्याचे चुंभळे यांनी सांगितले. या गुन्ह्यात यश गरुड याचेही नाव आहे. मात्र तो घटनेच्या वेळी कारागृहात असल्याने त्याचा या गुन्ह्याचा संबंध नव्हता. मात्र चुंभळे यांच्यासह मुंबईतील व्यावसायिक सुनील बबालाल शाह व रवींद्र चंपाशी जैन यांनी संगनमत करून दलित समाजावर अन्याय करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप गरुड याने केला. त्यानुसार गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...