Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : कंटेनर चालकाकडे मागितली खंडणी; पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर केला...

Nashik Crime : कंटेनर चालकाकडे मागितली खंडणी; पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर केला गुन्हा दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

परप्रांतीय कंटेनर चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याने हल्ला करून खंडणी (Extortion) मागणाऱ्या जेलरोड परिसरातील (Jail Road Area) दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन महिलांना ताब्यात घेतले असून, तिघे मात्र फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील चेहडी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना (Women) ताब्यात घेतले तर संशयित तीन युवक फरार झाले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालक रामनिवास गंगाप्रसाद वर्मा (वय ३८, रा. धुंदीगाव, मनगया, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते नाशिक येथील महिंद्रा कंपनीत चालक म्हणून कामाला असून, दि. ७ सप्टेंबर रोजी कंटेनर क्रमांक एमएच ०४ एमआर ०९४८ यामध्ये महिंद्रा कंपनी सातपूर येथून कंपनीचा माल भरून नाशिक-पुणे महामार्गावरून (Nashik-Pune Highway) अहिल्यानगर येथे जात होते.

यावेळी रविवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान चेहडी दारणा पुलावर (Chehadi Darana Bridge) चार ते पाच जणांनी कंटेनर थांबवला व त्यानंतर एकाने ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्मा यांच्या मनगटावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले तर इतर चार जण पाठीमागून रिक्षात आले व त्यातील काही जणांनी वर्मा यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड काढली. तसेच वर्मा यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिला असता त्यांना मारहाण सुरू केली व कंटेनर मालकाच्या क्युअर कोडवरून एक हजार रुपये मागून घेतले.

दरम्यान यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांचे वाहन पाहून युवकांनी (Youth) संशयित युवतींना सोडून रिक्षा घेऊन पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिलांना ताब्यात घेतले. वर्मा यांच्या,तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित निकिता विलास आव्हाड (वय २९ रा, शुभ संकेत अपार्टमेंट, तुलसी पार्क, शिवाजीनगर, जेलरोड) कोमल सुरेश आढाव (वय २३ रा, आनंद प्लाझा, जयहिंदनगर, राजराजेश्वरी मार्ग जेलरोड) प्रेम घाटे, धीरज घाटे, शुभम आढे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. तर फरार झालेल्या तिघा खंडणीखोरांचा नाशिकरोड पोलीस (Nashik Road Police) कसून शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...