Saturday, January 10, 2026
HomeनाशिकNashik Crime : 'रिल्स' व्हायरल करून दहशत; खुनातील दोषी कुंदन परदेशीसह साथीदारावर...

Nashik Crime : ‘रिल्स’ व्हायरल करून दहशत; खुनातील दोषी कुंदन परदेशीसह साथीदारावर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धमकी व इशाऱ्याचे ‘खळबळजनक’ रिल्स व्हायरल (Reels Viral) करीत लोकांच्या मनात दहशत निर्माण केल्याप्रकरणी खुनातील शिक्षाबंदी व कुंदन सुरेश परदेशीसह त्याच्या टवाळखोर साथीदारावर पंचवटी पोलिसांत (Panchvati Police) नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश वायकंडे यांनी शासनाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ जानेवारी रोजी ते सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असताना, त्यांना एक धमकी व इशारा देणारा व्हिडिओ दिसला. त्यांनी अधिक माहिती घेतली असता, त्यात गुंड कुंदन सुरेश परदेशी (रा. दळवी चाळ, हनुमानवाडी, पंचवटी) याचा टवाळखोर साथीदार तेजस अरुण भडांगे याने त्याच्या सांगण्यावरुन भाईगिरी व दहशत माजवण्यासाठी ‘रिल’ बनविल्याचे आढळले.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Municipal Election 2026 : नाशिककरांनो तुमच्या प्रभागात कुठल्या पक्षाचा कोणता उमेदवार; वाचा यादी एका क्लिकवर

कुंदन हा सराईत असून त्याला सुनील वाघ हत्याप्रकरणात (Sunil Wagh Murder Case) जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच, विविध खून, प्राणघातक हल्ले, खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. तो सध्या जामिनावर असल्याचे समजते. कुंदनवर कठोर कारवाईची शक्यता असून त्याचा साथीदार भडांगे आता रडारवर आला आहे.

बालेकिल्ल्यातून पुन्हा ‘रिल्स’ची दहशत

इन्स्टा व फेसबुक अकाऊंट्सवर दहशतीचे तसेच गंभीर गुन्ह्यात अटक करुन बेड्या ठोकत शहर पोलीस संशयितांना न्यायालय व अथवा पोलीस ठाण्यात नेत असल्याचे व्हिडिओ, त्याला धमकीचे ऑडिओ व काही चित्रपटातील गीते फिक्स करून भीती निर्माण केली जात आहे. असेच अनेक व्हिडिओ व रिल्स पुन्हा नाशिकच्या बालेकिल्ल्यातून ‘व्हायरल’ करुन गुंडगिरी व भाईगिरी माजविली जात आहे. त्यामुळे अशा गुंडापुंडांना हेरुन पुन्हा कायद्याचा हिसका दाखविण्याची गरज असल्याची अपेक्षा सुज्ञ नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : … अन् उद्धव ठाकरेंनी भाषणात आमदार फारांदेंचा उल्लेख करत भाजपला डिवचलं; नाशिककरांना वचनही दिलं

पूर्वी कारवाई तरी ‘बिनधास्त’

काही दिवसांपूर्वीच सराईत गुंड गणेश सुरेश वाघ, मंगेश सावकार गिते, अमोल काळू बोकड (रा. जलालपूर) व सलीम मोहम्मद शेख (रा. चुंचाळे) यांच्यावर आक्षेपार्ह व दहशतीचे रिल्स बनवून व्हायरल केल्याने गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता बालेकिल्ला विसरुन अनेकांनी निवडणूक रणधुमाळीत दहशतीचे ‘रिल्स’ व्हायरल करण्याचा उद्योग सुरु केला आहे.

ताज्या बातम्या

Onion export ban : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं सकंट

0
नाशिक । Nashik कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतातून सर्वाधिक कांदा ज्या देशात पाठवला जातो, त्या बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध घालण्याचा...