Saturday, July 25, 2026
Homeक्राईमNashik Crime : संकट काळात ज्याने दिला आधार आता त्यानेच...; तिघांवर झाली...

Nashik Crime : संकट काळात ज्याने दिला आधार आता त्यानेच…; तिघांवर झाली कारवाई

मदतीचा हात देणाऱ्या उद्योजकाला मेव्हणीची धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संकट काळात ज्या हाताने आधार दिला त्याच हाताला डसण्याचा निंदनीय प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. करोनाच्या कठीण काळात साडूला सावरण्यासाठी व्यवसायात भागीदार करून घेणाऱ्या एका उद्योजकाला चक्क एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) मुंबईतील (Mumbai) एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा (Case) दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अंबड येथील अश्विननगर भागात राहणारे गोविंद गौरीशंकर झा (४९) यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. करोना काळात त्यांचे साडू संशयित राजीव वसंत चौधरी (रा. कांदिवली, मुंबई) यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. माणुसकीच्या नात्याने आणि नातेसंबंध जपण्यासाठी झा यांनी राजीव यांना कंपनीत संचालक व महत्त्वाच्या पदावर सामावून घेतले. मात्र, काही काळातच राजीव यांनी विश्वासाला तडा देत कंपनीत आर्थिक अनियमितता आणि अपहार केल्याचे झा यांच्या निदर्शनास आले.

झा यांनी जेव्हा या अपहाराबाबत जाब विचारला तेव्हा राजीव चौधरी यांचे पितळ उघडे पडले. परिणामी, झा यांनी त्यांना पदावरून कमी करून त्यांचा राजीनामा घेतला. याच रागातून राजीव चौधरी यांनी पत्नी आणि वडिलांच्या (Father) मदतीने झा यांना मानसिक व आर्थिक विळख्यात ओढण्याचे षडयंत्र रचले.

संशयित राजीव चौधरी यांनी झा यांना धमकावण्यास सुरुवात केली. ‘मी तुझ्या कंपनीच्या खोट्या तक्रारी जीएसटी, एमआयडीसी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) च्या पोर्टलवर करेन आणि तुला अडकवून टाकेन’. ही कायदेशीर कटकट टाळायची असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी (Extortion) द्यावी लागेल, अशी मागणी केली. इतकेच नव्हे तर कंपनी सेक्रेटरी दीपल बिऱ्हाडे यांना मेल करून कंपनीबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पाठवून बदनामी करण्याचाही प्रयत्न केल्याचे नमूद आहे.

दरम्यान, सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर गोविंद झा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी करत आहेत. नातेसंबंधातील हा प्रकार पाहून पोलीसही (Police) चक्रावले असून, संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे आहेत संशयित

१) वंदना राजीव चौधरी (पत्नी), २) राजीव वसंत चौधरी (साडू), ३) वसंत चौधरी (वडील, सर्व रा. गोकुळ गार्डन, कांदिवली ईस्ट, मुंबई)

ताज्या बातम्या

ना. विखे पाटील यांची सोशल मिडियावर बदनामी; निमगाव जाळीच्या इसमावर लोणीत...

0
राहाता (प्रतिनिधी) जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून तयार केलेली बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये पसरवून लोकांमध्ये संभ्रम आणि मंत्री विखे...