Sunday, April 27, 2025
Homeक्राईमNashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Nashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील देवळालीगाव परिसरात (Deolali Gaon Area) धक्कादायक प्रकार घडला असून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने (Minor Girl) छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीना कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा :  Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवळाली गाव राजवाडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयात शिकत होती. रस्त्याने येता जाता गुलाबवाडी येथील कलाम इजहार मन्सूरी (वय २२) हा युवक (Youth) तिची छेड काढत लग्न करण्याचा आग्रह करीत होता. त्याच्या कुटुंबातील काही लोकदेखील आमच्या कलाम बरोबर लग्न करण्यासाठी त्या मुलीकडे तगादा लावत होते. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विहितगांव येथील पुलावर विषारी औषध सेवन केले.

हे देखील वाचा : Nashik News : संततधारेने घरांची पडझड; दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू

त्यानंतर तिला उपचारार्थ रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून युवक कलाम, त्याची आई व इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी करीत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0
चोपडा | प्रतिनिधी | Chopda जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार...