नाशिक | प्रतिनिधी | Nashik
संशयित (Suspectd) रियल इस्टेट एजंटने साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून फ्लॅट विक्रीपोटी एका व्यक्तीस पावणेतीन लाख रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. किरण विश्वनाथ चिंचोरे (४३, रा. गंगापूर रोड), जितेंद्र जयवंत शिर्के (५४), भाग्यश्री जितेंद्र शिर्के (५३, रा. शिळे इलेक्ट्रा, गंगापूर रोड), प्रशांत गिते (रा. मलेरिया स्टॉप, कॉलेजरोड) अशी संशयितांची नावे आहेत.
सतिश अरविंद आहिरे (३५, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना फ्लॅट खरेदी करायचा असल्याने त्यांना संशयित रियल इस्टेट एजंट किरण चिंचोरे याने गंगापूर रोड परिसरातील फ्लॅट संशयित शिर्के दाम्पत्याचा गंगापूर रोडवरील (Gangapur Road) मधुबन अपार्टमेंटमधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट दाखविला. शिर्के यांनी या फ्लॅटचा व्यवहार करण्याचा अधिकार आपल्याला दिल्याचे त्याने आहिरे यांना सांगितले.
त्यानुसार संशयिताने त्यांच्याकडून अनामत रककम घेतली. तसेच, संशयित प्रशांत गिते याच्यकडून या फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर करून घेत त्यांची २ लाख ७४ हजार ४९८ रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार २०१८ ते २०२३ या दरम्यान घडला आहे. गंगापूर पोलिसात (Gangapur Police) गुन्हा दाखल आहे.