नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यास (Student) सात जणांच्या टोळक्याने नाहक जबर मारहाण (Beaten) करत धमकावल्याची घटना पंचवटी कॉलेजजवळील गेटसमोर (दि.१८) घडली आहे. संशयित टोळक्याचा शोध आडगाव पोलिसांनी (Adgaon Police) सुरु केला असून पीडित मुलाच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरातील टवाळांची भाईगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. या रोडरोमियांवर कठोर कारवाईची अपेक्षा स्थानिकांसह काही तरुणींनी व्यक्त केली आहे.
१७ वर्षांचा एक कॉलेजकुमार पंचवटी कॉलेजवळ दुपारी साडेबारा वाजता मित्राशी गप्पा मारत असताना अचानक त्याच्यासमोर सात ते आठ जणांचे टोळके आले. त्यांनी, घोळका करत या मुलास कॉलेजच्या गेट समोरील भुयारी मार्गातून रस्त्याच्या पल्लीकडील पेरूच्या बागेत नेले. तेव्हा संशयितांनी (Suspect) या मुलास ‘तुला काही आठवते?’, असे म्हणून वाद घालत सर्व संशयितांनी त्याला लाथाबुक्यांनी येथेच मारहाण करण्यास सुरुवात करुन संशयितांपैकी एकाने या मुलाच्या दोन्ही हातांवर दांडक्याने फटके मारले.
तर दुसऱ्या संशयिताने मुलाच्या डाव्या पायाचे गुडघ्याचे खाली चाकूने बार करुन जखमी केले. यानंतर पुन्हा टोळक्याने या मुलाला हाताचापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ‘तू जर पोलीसांत तक्रार केलीच तर तुझा बेतच पाह’, अशी दमकी देत दमदाटी केली. यानंतर संशयित पळून गेले.
खुत्रस किंवा मुलीच्या कारणातून वाद
संशयित आणि पीडित मुलात जुनी खुन्नस, दहशत किंवा मुलीच्या वादातून वाद झाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, आडगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पडताळण्यास सुरुवात केली आहे. सर्वच आठ संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान, घटनेतील पीडित मुलाच्या कुटुंबाने संशयित टोळक्याच्या दहशतीवर तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर, संशयित १७ ते २० क्योगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.