Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik Crime : गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने पावणेपाच लाखांचा गंडा

Nashik Crime : गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने पावणेपाच लाखांचा गंडा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

शहरात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण वाढत असताना गॅस बिल अपडेट (Gas Bill Update) करण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाची तब्बल ४ लाख ८५ हजार ९९८ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना पंचवटी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या नावाचा गैरवापर करत अज्ञात सायबर भामट्यां विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी परिसरातील (Hanumanwadi Area) देवेंद्र हाईटस् येथे राहणारे शिक्षक अनिल पुंजाराम शेवाळे (५६) यांना २६ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून कॉल व मेसेज प्राप्त झाला. तुमचे ५,९०५ रुपयांचे गॅस बिल थकीत आहे. तातडीने भरा, अन्यथा गॅसपुरवठा खंडित केला जाईल, अशी भीती दाखवत त्यांना लिंक पाठवण्यात आली. सदर संदेशावर विश्वास ठेवून शेवाळे यांनी ती लिंक डाऊनलोड केली.

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत त्यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ४ लाख ८५ हजार ९९८ रुपये परस्पर वळते केले. खात्यातून पैसे डेबिट झाल्याचा संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेनंतर शेवाळे यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...