Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : बँक सेवकाने महिलेचे १५ लाख हडपले

Nashik Crime : बँक सेवकाने महिलेचे १५ लाख हडपले

मानूर | Manur | वार्ताहर

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) देसराने येथील विधवा महिलेची (Woman) बँक कर्मचाऱ्याने सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचे उघड झाले आहे. यााबत संबंधित महिला ललिता सोमनाथ मोरे यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद कळवण पोलिसात (Kalwan Police) दाखल केली आहे. पोलिसांनी अॅक्सिस बँकेतील तत्कालीन कर्मचारी तुषार गोसावी यांच्या विरोधात १५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोरे यास अटक केली आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती अशी की, देसराने येथील ललिता सोमनाथ मोरे (३५) यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे हे महावितरण कंपनीत नोकरीस (Job) होते, त्यांचे फेब्रुवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महावितरणकडून त्यांना १५ लाख रुपये मदत मिळाले होते. ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवलेले होते. काही दिवसांनी अॅक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खैरनार हे दोघे या महिलेची माहीती काढून घरी येवु लागले. घरी आल्यावर तुषार गोसावी याने महिलेला त्यांच्याकडे आलेल्या पैश्यांचे (Money) व्यवस्थित नियोजन करुन देतो असे सांगून आमच्या अॅक्सिस बँकेत तुमचे खाते ओपन करुन खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करुन देतो असे त्यांनी सांगितले.

ललिता मोरेला व्यवहाराचे जास्त ज्ञान नसल्याने तुषार गोसावी या अॅक्सिस बँक कर्मचाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन त्याला जे पाहीजे ते कागदपत्रे (Documents) उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्याने या महिलेस सांगीतले की, आपण काही पैसे मुलींच्या भविष्यासाठी अॅक्सिस बँकेच्या म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवू त्यासाठी तुम्हाला मी सांगेल त्या प्रमाणे पैसे ट्रान्सफर करावे लागतील. त्या दरम्यान त्याने सदर महिलेच्या नावाच्या बैंक अकाउंट मधुन परस्पर काढुन घेत वेळोवेळी त्याच्या व इतरांच्या खात्यात दहा लाख रुपये वर्ग केले.

सन २०२२ मध्ये काही दिवासांनी तुषार त्याच्या आईला सोचत घेवुन ललिता मोरेंच्या घरी आला व बोलला की, एक खुप चांगली बँकेची स्कीम आली आहे, ज्यात तुम्हाला एफ.डी. पेक्षा जास्त व्याजदाराने परतावा मिळेल फक्त ते आपण दुस-याच्या अकाउंटवरुन करु, यासाठी तुम्ही मला रोख स्वरुपात ५,००,००० रुपये द्या. माझ्या आईने पण त्यात पैसे गुंतवले आहेत तुम्ही त्यांना विचारुन बघा. आईसोबत आल्याने व तो बँकेचा कर्मचारी असल्याने ललिताने त्याच्यावर विश्वास ठेवुन परत एकदा रोख स्वरुपात ५,००,००० रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी ललिता मोरे पैसे काढण्यासाठी अॅक्सिस बँकेत गेली असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, तुमच्या अॅक्सिस बँके च्या अकाउंटवर कोणतीही रक्कम शिल्लक राहिलेली नाही हे ऐकुन ललिताला धक्का बसला.

यावेळी बँकेचे मॅनेजर (Bank Manager) अतुल गिते यांना भेटुन माझ्या खात्या वरील पंधरा लाख रुपये कुठे गेले असे विचारणा केली असता त्यांनी तिला बँकेचे स्टेटमेंट काढून दाखवले तर बँकेच्या स्टेटमेंट मध्ये ललिताच्या खात्यावरून तुषार गोसावी, भगवती ट्रेडर्स, महेश कुवर व इतर लोकांच्या खात्यांवर परस्पर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत महेश कुबर व इतर लोकांना तुमच्या अकाउंटवर पैसे कसे आले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे तुषार गोसावी याने ट्रान्सफर केले व ते पैसे आम्ही लगेच तुषार गोसावीला दिले असल्याचे सांगीतले. तुषार गोसावी या इसमाने ललिता मोरेची बँक कर्मचारी म्हणुन मोबाईल बँकींगची माहीती बँकेतून घेवुन जुलै २०२१ ते मार्च २०२४ च्या दरम्यान एकुण पंधरा लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

दरम्यान, या अनुषंगाने ललिता मोरे हिच्या फिर्यादीवरून अॅक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यातः भारतीय दंड संहिता अन्वये कलम ४०९ व ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...