बेलगाव कुऱ्हे | वार्ताहर| Belgaoan Kurhe
पिंपळगाव डुकरा परिसरात राहणाऱ्या संशयिताने त्याच्या पत्नीविषयी (Wife) वाईट बोललेल्या एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली. अनिल एकनाथ गिहे (रा. गिहेवाडी पिंपळगाव घाडगा, ता. इगतपुरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दोन तासात संशयिताला (Suspected) ताब्यात घेतले. अजय पवार असे संशयिताचे नाव आहे.
वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडीराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासात संशयिताच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडीव-हे पोलिसांचे कौतुक केले.
येथील भाडेकरू महिला मंगल वाळू मधेचा मोठा भाऊ अजय रंगनाथ पवार व भावजयी काजल अजय पवार हे आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव डुकरा (Pimpalgaon Dukra) येथे आले होते. मयत अनिल गिरे व आरोपी अजय पवार हे दोघे रोज एकत्र बसायचे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास काजल पवार हिने मंगल मधे यांच्याकडे धाव घेत सांगितले की, अनिल गिहे हा पती अजय पवार यांच्यासह घरी आले होते.
त्यांचे आपसात भांडण चालू झाले आहे. माझे पती रागाच्या भरात काहीतरी करतील, तुम्ही लवकर घरी चला असे सांगितले. दोघी घरी आल्यावर अनिल एकनाथ गि-हे हा रक्तबंबाळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. ही घटना त्यांनी वाडीव-हे पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला लपून बसलेला मिळून आला. पोलिसांनी (Police) त्याला ताब्यात घेतले.




