Sunday, May 11, 2025
Homeक्राईमNashik Crime : मद्यपी, टवाळखोरांवर दंडुका; परिमंडळ एक आणि दोनमध्ये ६८२ जणांवर...

Nashik Crime : मद्यपी, टवाळखोरांवर दंडुका; परिमंडळ एक आणि दोनमध्ये ६८२ जणांवर ‘अचानक’कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलिसांच्या (City Police) परिमंडळ एक आणि दोनच्या (Zone One and Two) हद्दीतील विविध चौकांसह मद्य दुकाने व पानटपरींजवळ घोळका करुन धुडगूस घालणाऱ्या ६८२ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. उघड्यावर मद्यपान व पॅक भरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद खावा लागला.

- Advertisement -

यानंतर, सर्वांची वरात त्या-त्या पोलीस ठाण्यात नेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.शहरातील तेराही पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीतील चौकांत सिगारेटचे झुरके उडविण्यासह थेट मोकळे मैदान, जागा व वाईनशॉप बाहेरच मद्यपान करणाऱ्या टवाळखोर व इतर संशयितांवर शुक्रवारी रात्री सात वाजेनंतर अचानक कारवाई अंमलात आणण्यात आली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandip Karnik) यांनी ‘स्ट्रीट क्राईम’ला प्रतिबंध व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वच एसीपी व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.त्यान्वये परिमंडळ एकमध्ये पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या सूचनेनुसार, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड या विभागांच्या सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांनी गुन्हेशोध पथक व पोलीस ठाण्यातील अंमलदार सोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप अँण्ड सर्च मोहीम राबविली.

यात परिमंडळ एक हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या ३४० संशयितांविरुद्ध तर, परिमंडळ दोन हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून ३४२ अशा एकूण ६८२ संशयितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली. यापुढही अचानकपणे रस्त्यांवर ही मोहीम राबवून संशयित वाहने व टवाळखोरी करणाऱ्यांवर निरंतर कारवाई (Action) करण्यात येणार आहे, असा इशारा आयुक्तालयाने दिला आहे.

टेम्पो ट्रॅव्हेलरमधून रवानगी

अंबड पोलिसांनी मद्य दुकाने व बिअरबारजवळील गर्दी हेरून उघडपणे मद्यपान करणाऱ्यांची कॉलर पकडून व पाठलाग करून ताब्यात घेतले. अनेक संशयित मद्याच्या नशेत, काही खरेदीच्या तयारीत असल्याचे आढळून आले. अचानक पोलीस आल्याचे पाहून त्यांची तारांबळ उडाली. विशेष करून अंबड पोलिसांनी संशयितांना पकडून नेण्यासाठी एका ट्रॅव्हेलरचा वापर केला. तसेच संशयितांना सक्त सूचना व कारवाई करुन नंतर सोडून देण्यात आले. कारवाईदरम्यान अनेक संशयितांच्या (Suspect) दुचाकी पथकांनी ताब्यात घेतल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉर्निंग वॉक करणाऱ्या वयोवृद्धाचे दागिने पळवले

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरात (Nashik City) भाजीपाला खरेदीसह मॉर्निंग वॉक आणि शतपावली करणे वयोवृद्धांसह महिलांना नकोसे झाले आहे. कारण, शहरात भर सकाळी...