Wednesday, February 19, 2025
HomeUncategorizedNashik Crime : टेरेसवरील जुगार अड्डा उद्ध्वस्त; सात अटकेत, 'इतक्या' हजारांचा मुद्देमाल...

Nashik Crime : टेरेसवरील जुगार अड्डा उद्ध्वस्त; सात अटकेत, ‘इतक्या’ हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिडकोतील (Cidco) अश्विननगर येथील एका हॉटेलच्या टेरेसवर चोरीछुप्यारितीने जुगार (Gamblers) अड्डा सुरू असताना, अंबड पोलिसांनी (Ambad Police) छापा (Raid) टाकून ७ जुगाऱ्यांविरोधात गुन्हा (Case) दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, अश्विननगर परिसरात सहारा हॉटेल आहे. या हॉटेलच्या टेरेसवरील मोकळ्या जागेत चोरी-छुप्यारितीने जुगार अड्डा सुरू असल्याची खबर अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलिसांनी मंगळवारी (ता१४) जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. त्यावेळी याठिकाणी ५२ पानी पत्त्यांवर पैसे लावून अंदर-बाहर नावाचा जुगार खेळविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी यावेळी २३ हजार ९०० रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

तर याठिकाणी प्रमोद अण्णा कवळे (३३, रा. साईबाबानगर, सिडको), किरण राजेंद्र गायकवाड (३२, रा. उत्तमनगर, सिडको), भोजराज श्रावण सोनवणे (३७, रा. साईबाबानगर, सिडको), महेश बसवराज वाळके (३२, रा. प्री व्हिलेज सोसायटी, दामोदर चौक, पाथर्डी फाटा), अनिल सुरेश शेवाळे (३८, रा. उमा सी, अंबडगाव), जयवंत अशोक पाटील (३३, रा. विघ्नहर्ता सोसायटी, दामोदरनगर), प्रितेश विलास देशमुख (३०, रा. साईबाबानगर, सिडको) हे जुगार खेळताना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या पथकाने कारवाई केली आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या