Saturday, September 12, 2026
Homeक्राईमNashik Crime : अंबड पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई

Nashik Crime : अंबड पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत विविध ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत १०३ टवाळखोरांवर कारवाई केली.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर मद्यपान करणे, रस्त्यावर टवाळखोरी करणे, चौकाचौकात बसून गोंधळ घालणे अशा विविध प्रकारांनी नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिले.

- Advertisement -

पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, उपायुक्त परिमंडळ २ किशोर काळे, सहायक आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, चुंचाळे चौकीचे पोलीस निरीक्षक संतोष नरूटे तसेच नाशिकरोड पोलीस ठाणे (Nashik Road Police Station) सातपुर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, देवलाली कॅम्प पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट क्र. १ ते ४ चे अधिकारी व ६८ अंमलदारांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

मनोज

Manoj Jarange Patil: हळदी-कुंकू सौभाग्यचं लेणं, अमृताताई-लताताईंकडे हळदी-कुंकू घेऊन जा; मनोज...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईतील आझाद मैदानाकडे जाण्याची घोषणा केली आहे. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी...