Friday, June 20, 2025
Homeक्रीडाNashik Crime : परमिट रुम लक्ष्य करणारा कुट्टी ताब्यात; गुंडाविरोधी पथकाची कारवाई

Nashik Crime : परमिट रुम लक्ष्य करणारा कुट्टी ताब्यात; गुंडाविरोधी पथकाची कारवाई

दोन बारमध्ये तीनदा चोरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकाच हॉटेलमध्ये दोनदा घरफोडी (Burglary) करून मद्यसाठा व रोकड चोरणाऱ्या सराईत चोरट्यास गुंडाविरोधी पथकाने गजाआड (Arrested) केले आहे. हसन आमजा कुट्टी (४६, रा. नवनाथनगर, पेस्रोड, पंचवटी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडील चौकशीत त्याने दोन हॉटेलमध्ये तीनदा घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संशयित (Suspectd) कुबुद्धी यास पेठरोड परिसरातून पकडले. त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासात त्याने पेठरोड येथील पवार लॉन्स जवळील न्यु उत्तम हिता (घुारु) या हॉटेलमध्ये फेब्रुवारी व नोव्हेंबर २०२४ मध्ये दोनदा घरफोडी करून २ लाख ६९ हजार १२० रुपयांचा ऐवज चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मुंबईनाका येथील रसोई हॉटेलमध्ये एप्रिल महिन्यात घरफोडी करून ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे सांगितले.

दरम्यान, संशयित बुद्धी याने परमिट रूम हॉटेलला (Hotel) लक्ष करीत तेथील मद्यसाठा व रोकड चोरण्याचे सत्र सुरु केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. पथकाचे प्रभारी व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या सूचनेने अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राठोड, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

तीसहून अधिक गुन्हे

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, संशयित हसन कुट्टी हा सराईत चोर आहे. त्याने परराज्यातील चोरांसह मिळून टोळी तयार केली व घरफोड्यांचा सपाटा लावला होता. त्याला घरफोडी केल्याप्रकरणी काही गुन्ह्यांमध्ये शिक्षाही झाली आहे त्याच्यासह टोळीविरोधात ३० हुन अधिक घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...