Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : आयबीचे पथक नाशकात; अबू सालेमच्या मैत्रिणीसह ॲस्ट्रोलॉजर एटीएसच्या...

Nashik Crime News : आयबीचे पथक नाशकात; अबू सालेमच्या मैत्रिणीसह ॲस्ट्रोलॉजर एटीएसच्या ताब्यात

नाशिक | Nashik

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी गँगस्टर अबू सालेम (Abu Salem) अब्दुल कयुम अन्सारी याला नाशिक कारागृहात (Nashik Jail) भेटण्यासाठी आलेल्या तिघांची सलग दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. याप्रकरणी सखोल चौकशीसाठी ‘इंटेलिजन्स ब्यूरो’चे (आयबी) पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. सालेमची मुंब्यातील प्रेयसी, केनियातील व्यावसायिकासह अंधेरीच्या एका वास्तुविशारदाची अजूनही सखोल चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pankaja Munde : “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, आता आपला डाव खेळणार”; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निर्धार

नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाजवळून (Nashik Road Central Jail) गुरुवारी (दि.१०) दुपारी नाशिकरोड पोलिसांसह नाशिक दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) तिघांना ताब्यात घेतले. मदत सबूरअली चतूर (७४, रा. नैरोबी, केनिया), बहार कौशल समी सय्यद (३३, रा. मुंब्रा, ठाणे) आणि सुलेमान सुलतान खोजा (४६, रा. अंधेरी पश्चिम) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांपैकी चतूर व सय्यद हे सालेमला भेटण्यासाठी आले होते, तर खोजा हा त्या दोघांना नाशिकमध्ये घेऊन आला होता.

हे देखील वाचा : Manoj Jarange Patil : “मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…”; जरांगेंचा नारायण गडावरून सरकारवर निशाणा

शुक्रवारी (दि. ११) सकाळी मुंबई येथून ‘आयबी’चे पथक नाशिक ‘एटीएस’ कार्यालयात दाखल झाले. सशस्त्र बंदोबस्तात तिघांचीही कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे हे तिघेही स्वतंत्र ठिकाणाहून एकत्रित येत नाशिकमध्ये पोहोचले. त्यानुसार केनिया-मुंब्रा-अंधेरी ‘कनेक्शन’ सह सालेमसोबत तिघांचा संबंध काय, भेटण्याचे कारण, तिघांची पार्श्वभूमी जाणून घेत पथकाने सखोल तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा : Raj Thackeray : “बेसावध राहू नका, हीच क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचे पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना आवाहन

दरम्यान, सालेम याला जुलै २०२४ मध्ये नवी मुंबईतील (Mumbai) तळोजा मध्यवर्ती कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. तेव्हापासून त्याच्या सुरक्षेसाठी कारागृहात स्वतंत्र पथक तैनात आहे. चतूर, सय्यद व खोजा हे तिघेही ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते साडेआठ या वेळेत इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीतील एका नामांकित हॉटेलात पोहोचले. दिवसभर तिथे थांबल्यानंतर तिघेही १० ऑक्टोबर रोजी अबू सालेमची भेट घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. त्यामुळे त्यांनी एक दिवस शहरात मुक्काम केल्याचे उघड झाले आहे.

हे देखील वाचा : RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “दुर्बलता…”

खोजाने वास्तुविशारदेचे मुद्दे सांगितले

चतुर हा केनियातील रहिवासी असून बडा व्यावसायिक आहे. त्याचे आठ मॉल, चार हॉटेल्स आणि दोन क्लब असल्याचे कळते. यासह एका कंपनीचा तो संचालक असून मालमत्ता खरेदी-विक्रीचाही व्यवसाय करतो. तर बहार सय्यद ही वाणिज्य शाखेची पदवीधर तरुणी आहे. सुलेमान खोजा हा वास्तुविशारद आणि ज्योतिषी आहे. या तिघांनीही ‘एटीएस’च्या चौकशीदरम्यान ठोस उत्तरे दिल्याचे कळते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या