Friday, November 22, 2024
Homeनाशिकमोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

मोठी बातमी! नाशकात एटीएसची कारवाई; बांगलादेशी घुसखोर ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखाेरांना नाशिक एटीएस (Nashik ATS) व इंदिरानगर पाेलिसांनी अटक (Arrested) केली आहे. साेबतच, एका स्थानिक संशयितासही ताब्यात घेऊन चाैकशी सुरु केली आहे. दरम्यान, हे बांगलादेशी संशयित केवळ वास्तव्यासाठी थांबून असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समाेर येत असून त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू किंवा पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे घातपाताचा इरादा सध्यातरी उघड हाेत नसल्याचे नाशिक शहर पाेलिसांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक अटकेत

इंदिरानगर पाेलिसांच्या (Indiranagar Police) हद्दीतील पाथर्डी फाटा परिसरात भाडेतत्वावर घर घेऊन वास्तव करणाऱ्या तिघा बांगलादेशी नागरिकांंवर इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएसने रविवारी (दि.१८) ही कारवाई केली. नाशिक एटीएसला शनिवारी तिघे संशयित बांग्लादेशी नागरिक नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार इंदिरानगर पाेलिसांच्या मदतीने एटीएसने रविवारी(दि. १८) पहाटे तीन वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत सापळा रचला. यानंतर, संबंधित परिसरात तळ ठाेकून आवश्यक त्या फाैजफाट्यासह एटीएसने थेट कारवाई करत एक बांग्लादेशी महिला व दाेन पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगलखाेर निघाला ‘एमडी’ डिलर; शहरात दाेन टाेळ्यांचे रॅकेट उघड

तसेच घरात काही संशयास्पद मिळते का यासाठी झडती घेतली. मात्र, काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही. दरम्यान, या तिन्ही बांगलादेशी नागरिकांकडे तेथील नागरिकत्वाचे जेमतेम पुरावे मिळाले असून या कागदतपत्रांचा आधार पडताळला जात आहे. तर, प्रकरणात तिन्ही संशयित बांग्लादेशा नागरिकांच्या वांरवार संपर्कात असलेल्या स्थानिक नागरिकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत इंदिरानगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु हाेते. याबाबत अधिक तपास सुरु असून संशयित स्थानिक रहिवाश्याने या तिन्ही बांगलादेशी (Bangladeshi) व्यक्तिंना जागा व इतर बाबी उपलब्ध करुन दिल्याचे प्राथमिक तपासात समाेर येते आहे. मात्र, याप्रकरणात कुठलाही धाेका नसल्याचे उघड हाेत असल्याने तिघांची कसून चाैकशी केली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : नवीन कसारा घाटात भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

हे आहेत संशयित

भारतात घुसखोरी करत नाशकात प्रवेश करुन भाडेतत्वावर बांगलादेशी संशयित शागोर मोहंमद अब्दुल हसुने माणिक (२८), मुस्समत शापला खातून (२६), इति खानम मोहंमद शेख (२७, सध्या सर्व रा. काजी मंजील, पाथर्डी गाव, नाशिक) हे वास्तव्य करत हाेते. त्यांना वास्तव्यासाठी सर्वोतोपरी मदत करणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२) याला अटक केली आहे. संशयितांविरुद्ध दहशतवादविरोधी पथक(एटीएस) नाशिक युनिटच्या सहायक निरिक्षक योगिता पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंदिरानगर पोलीस तपास करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या