नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
मुलाला व सुनेला (Son and daughter-in-law) निवडून आलेल्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत सुनेचा विनयभंग केल्याचा आरोप करत पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत महिलेले स्वतःवर राँकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी (Police) व नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
रविवारी रात्रीच्या वेळी भांडण सोडवायला गेलेल्या युवकाला चार ते पाच टवाळखोरांनी “आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) व विनोद मगर यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही मर्डरही केला आहे, आम्हाला कोणाचीच भीती नाही,” अशा धमक्या देत बेदम मारहाण केली. यावेळी त्या युवकाच्या पत्नीने त्यांना विरोध केला असता त्या टोळक्याने त्या महिलेला देखील मारहाण करत त्यांचा विनयभंग केला.
यावेळी नागरिकांनी हस्तक्षेप करत युवकाला व त्याच्या पत्नीला टोळक्याच्या ताब्यातून सोडविले.यावेळी तरुणाने त्याच्या पत्नीसह अंबड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी (Police) त्यांना अगोदर दवाखान्यात जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला. यावेळी युवकाच्या आईने पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पोलीस दवाखान्यात त्यांच्या सुनेचा जबाब नोंदविण्याकरिता गेले असता डॉक्टरांनी युवती जखमी असून जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितल्याने पोलिसांना माघारी फिरावे लागले.
दरम्यान, घटनेच्या दुसर्या दिवशी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान तरुणाच्या आईने (Mother) दिव्या कार्निवाल थिएटरच्या चौफुलीवर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच लागलेल्या निकालामुळे हे राजकीय षडयंत्र घडवून आणल्याचे सांगत पोलीस खरा गुन्हेगार शोधतील असा विश्वास व्यक्त केला. या घटनेतील संशयितांनी एका महिलेला मारण्याचे केलेले धाडस हे पोलीस यंत्रणेला आव्हान देणारे ठरले आहे. पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या कायद्याच्या बालेकिल्ल्याच्या संकल्पनेला यामुळे धक्का लागला आहे.




