Thursday, May 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'ऑरा' बार गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा; थेट रक्ताचे डाग...

Nashik Crime : ‘ऑरा’ बार गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा; थेट रक्ताचे डाग पुसून…

लोंढे टोळी तुरुंगातच; गुन्हेगारांना साथ देणारा डॉक्टर अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर येथील ‘ऑरा’ बार गोळीबार प्रकरणात (Aura Bar Firing Case) एक खळबळजनक खुलासा झाला आहे. बारमध्ये गोळीबार झाला, त्याच बारच्या मालकाने पोलिसांना (Police) तपासात सहकार्य करण्याऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आयटीआय सिग्नलजवळील ‘ऑरा’ बारमध्ये राडा झाला होता. कुख्यात भूषण लोंढे (Bhusha Londhe) टोळीने केलेल्या या गोळीबारात वरुण तिवारी हा तरुण जखमी झाला होता. मात्र, तपास पथकाला चकवा देण्यासाठी बार चालक डॉ. बिपिन पुरुषोत्तम पटेल आणि त्याचा साथीदार निले श जोशी यांनी घटनास्थळावरील रक्ताचे डाग स्वच्छ केले आणि इतर तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी या तपास केला असता, सीसीटीव्ही फूटे जसह तांत्रिक तपासात दोघांचे कारस्थान उघड झाले. कायद्याचे रक्षक बनायचे सोडून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले आहे. त्यांना कोठडी सुनावण्यात (Police Custody) आली. वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या पथकाने लोंढे टोळीला तेव्हा अटक (Arrested) केली होती.

लोंढे टोळी तुरुंगातच

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि ‘पीएल गँग’चा म्होरक्या माजी नगरसेवक प्रकाश मोगल लोंढे याच्यासह १८ गुंडांवर शहर पोलिसांनी आधीच ‘मोक्का’ कारवाई केली आहे. यात, दिपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, भूषण प्रकाश लोंढे उर्फ भाईजी, प्रिंस चित्रसेन सिंग, शुभम उर्फ भुऱ्या राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत राजू अडांगळे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताठे, शुभम रामगिर गोसावी, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर, शुभम चंद्रकांत निकम, वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखिल मधुकर निकुंभ, संदीप रमेश गांगुर्डे या संशयितांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजुरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)...