Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : भूषण लोंढेसह प्रिन्सला दुसऱ्यांदा पोलीस कोठडी; प्रोटेक्शन मनीचा तपास

Nashik Crime : भूषण लोंढेसह प्रिन्सला दुसऱ्यांदा पोलीस कोठडी; प्रोटेक्शन मनीचा तपास

मोक्का प्रस्ताव लवकरच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोळीबारासह (Firing) मोक्काच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपासून पसार असलेल्या भूषण प्रकाश लोंढेसह (Bhushan Londhe) त्याचा खास मित्र प्रिन्स सिंगला न्यायालयाने आठ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर (Police Custody) पुन्हा चार दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे सातपूरच्या ऑरा बारमध्ये ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गोळीबार करुन खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यातील रोकड पिस्तुलातील पुगळी जप्त करणे बाकी असल्याने ही वाढीव पोलीस कोठडी पोलिसांच्या मागणीनुसार न्यायालयाने (Court) ठोठावली.

- Advertisement -

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भूषण लोंढेला अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आदेश दिले होते. त्यानंतर युनिट दोनच्या पथकाने हरियाणामार्गे उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून नेपाळ बोर्डर गाठून प्रिन्स सिंग व लोंढेला अटक केली होती. ५ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी (दि. १२) कोठडी संपल्याने, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना वाढीव तीन दिवसांची म्हणजेच १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

YouTube video player

दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर दोघेही पसार झाले. विविध राज्यांमध्ये ओळख लपविताना भूषण व प्रिन्सने बनावट आधारकार्ड बनविले. याच आधारकार्डद्वारे त्याने यूपीतील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. तपास अंबड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी करत आहेत. दरम्यान, प्रोटेक्शन मनीच्या नावे उकलेले पैसे लोढेंसह इतरांनी कुठे वापरले, तसेच त्यातून काही मालमत्ता घेऊन त्यासंदर्भान केलेले आर्थिक व्यवहार पडताळले जात आहेत. यापुढे लोंढे गँगच्या अडचणीत वाढ होतांना दिसणार आहे.

अनेक गुन्ह्यांची उकल

संशयित भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर सातपूर, अंबड, गंगापूर आदी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर हाणामारी, प्रॉपर्टी हडपणे, खंडणी अशा अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. याशिवाय लोंढे टोळीवर मागील काही दिवसात अनेक गुन्हे दाखल झाले असून, त्यादृष्टीने पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केल्याचे कळते.

ताज्या बातम्या