Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमNashik Crime : प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीला संपवलं; अखेर 'त्या' तरुणीच्या हत्येचा...

Nashik Crime : प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीला संपवलं; अखेर ‘त्या’ तरुणीच्या हत्येचा उलगडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाडीव-हे पोलीस ठाणे (Wadivarhe Police Station) हद्दीतील सारूळ गावालगतच्या आठवा मैल परिसरात शुक्रवारी (दि.२०) दुपारी रस्त्यापासून आत सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेतजमिनीवर तरुणीचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे होते, तसेच तिची ओळख पटलेली नव्हती. यानंतर त्या मुलीच्या हत्येचा उलगडा झाला असून, तिची ओळख पटली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती काळे (वय १६, रा. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे मयत मुलीचे नाव आहे. दुसऱ्या मुलाशी बोलते या रागातून तिच्या प्रियकरानेच (Boyfriend) मित्रांच्या मदतीने संस्कृतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. अथर्व देशमुख (वय २१) असे प्रियकर संशयित आरोपीचे नाव असून, त्याने मित्राच्या मदतीने प्रेयसीचा खून करून मृतदेह सारूळच्या जंगलात फेकून दिला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांना ताब्यात घेतले असून, ही हत्या इतकी क्रूर होती की तिच्या गळ्यात चाकू अडकलेला होता. तर तोंडात पिझ्झाचा अर्धवट तुकडा आढळला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुलीची ओळख पटवली असून, ती बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. तर संशयित आरोपी प्रियकर नाशिकमधील (Nashik) एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...