Monday, January 26, 2026
HomeनाशिकNashik Crime : सायबर फसवणुकीचा नाशकात पहिला बळी

Nashik Crime : सायबर फसवणुकीचा नाशकात पहिला बळी

व्यावसायिकाची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात सायबर फसवणुकीतून (Cyber Fraud) तिडके कॉलनीतील व्यावसायिकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. सायबर फसवणुकीच्या बळीचा हा शहरातील पहिलाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओळखीतील मित्र व नागरिकांकडून कर्जाऊ स्वरुपात घेतलेले पंचावन्न लाख रुपये गुंतविले. मात्र, फसवणूक झाल्याचे समजताच कर्ज (Loan) कसे फेडणार, या विवंचनेतून ही आत्महत्या घडली असून, आता सायबर पोलिसांत संशयित जीमेल अकाऊंटधारक, फेसबुकच्या यूआरएल व मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रशांत साहेबराव पाटील (वय ४०, रा. मातोश्री अपा. तिडकेनगर, उंटवाडी रोड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे (Businessman) नाव आहे. ६ जून २०२५ रोजी ही घटना घडली आहे. याबाबत त्यांची पत्नी हर्षाली यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, डिसेंबर २०२३ ते ६ जून २०२५ या कालावधीत प्रशांत पाटील यांच्या फेसबूक अॅपवर संशयित अकाऊंट धारकाने यूआरएल https://www. facebook.com/padma. v.chikte व इ-मेल आयडी padmavchiktegmail. com आणि मोबाईल कमांक ९१५६०९७८०५ वरुन मेल व संपर्क साधला. त्यानंतर, हापको ऑईलचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पाटील यांना गुंतवणूक (investment) करण्यास भाग पाडले.

YouTube video player

नवीन व्यवसायास आणि नफा मिळेल, यासाठी पाटील यांनी मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसट व मोहित संदीप एखंडे यांच्याकडून कर्जाने व उसने पैसे घेतले. तब्बल ५५ लाख ७९ हजार रुपये जमा होताच, पाटील यांनी संशयितांच्या सांगण्यानुसार विविध बँक खात्यांत हे पैसे (Money) गुंतविले. मात्र, अनेक दिवस होऊनही परतावा व ऑईल व्यवसायासंबंधी काम होत नसल्याने ते विवंचनेत सापडले. त्यांनी संशयितांना (Suspected) वारंवार संपर्क साधला. मात्र, अपयश आले. त्यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव होताच, ते तणावात गेले. मित्रांचे पैसे व कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असतांना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीला पुसटशी कल्पना

घटनेपूर्वी पाटील यांनी घडलेल्या फसवणूक प्रकाराची कल्पना पत्नी हर्षाली यांना दिली होती. फिर्याद दाखल करण्याचा विचार सुरु असतानाच, पाटील यांनी जीवन संपविले. त्यानुसार आता फेसबुक आयडीधारक, मेल आयडीधारक, मोबाईलधारक व रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांवर फसवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...