ओझे l विलास ढाकणे | Oze
किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत पिक कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी संगनमताने कट रचुन बनावट कागदपत्रे सादर करुन महाराष्ट्र ग्रामीण बँक दिंडोरी शाखेला ४३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या १५ संशयितांविरोधात दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) शाखा व्यवस्थापकयांच्या फिर्यादीनुसार न्यायालयाच्या (Court) आदेशान्वये गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, सन २०१४ ते २०१६ या दरम्यानच्या कालावधीत किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत पिककर्ज घेतलेले थकित कर्जदार यांची वसुली बाबत वरीष्ठ कार्यालयाकडुन दिंडोरी शाखेचे शाखा व्यवस्थापक भालचंन्द्र देशपांडे यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा बँकेच्या कर्मचार्यांकडुन या संदर्भात माहिती घेतली असता थकित कर्जदार यांची फाईल दिली.
त्यात गौतम गोपाळ बस्ते रा.हातनोरे ,ता.दिंडोरी, पिक कर्ज ३ लाख, शंकर बाळकृष्ण जाधव रा.पालखेड बंधारा, ता.दिंडोरी पिक खर्ज ३ लाख, हिराबाई बाळकृष्ण जाधव, रा. पालखेड बंधारा ता.दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, पुंडलिक भगवंत बोरस्ते रा.हातनोरे, ता.दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, संदिप रघुनाथ जाधव रा.दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, प्रविण अंबादास जमधडे रा. पिंगळे गल्ली, मखामलाबाद, नाशिक पिक कर्ज ३ लाख, अंबादास खंडेराव जमधडे रा.पिंगळे गल्ली मखमलाबाद, नाशिक, पिक कर्ज ३ लाख, आरती मोहन पेलमहाले रा. पाडे, ता,दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, पुजा नरेन्द्र पेलमहाले रा. पाडे, ता.दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, प्रमिला सुभाष पेलमहाले रा. पाडे, ता.दिंडोरी, पिककर्ज २ लाख ५० हजार, सिंधुबाई महादु नाठे रा.पाडे, ता, दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, गायत्री कृष्णा पवार रा.जालखेड, ता.दिंडोरी पिक कर्ज २ लाख ५० हजार, योगेश भिका पिंगळ रा.अवनखेड ,ता.दिंडोरी पिक कर्ज ३ लाख, पोपट शिवाजी बोरस्ते रा.हातनोरे, ता. दिंडोरी, पिक कर्ज ३ लाख, युवराज भिका सहाळे रा. कादावा म्हाळुंगी, ता.दिंडोरी पिककर्ज २ लाख ५० हजार अशा १५ संशयितांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत एकूण रक्कम ४३ लाख ५० हजार रुपये इतके कर्ज घेतले.
कर्ज घेतल्यापासून एकदाही कर्ज (Loan) नुतनीकरण केले नाही. सन २०१७ मध्ये बँकेचे आॅडीट झाले तेव्हा आॅडीट करणारे अधिकारी यांच्या नजरेस या प्रकरणातील संशयास्पद बाबी नजरेस पडल्या. सदर १५ खातेदार यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन पिक कर्ज घेतले आहे. तसेच काही कर्जदार यांचे नावाने क्षेत्रकमी असताना पडताळणी अंती यात बनावटीकरण करण्यात आल्याचे तलाठी यांचे अहवालावरुन स्पष्ट झाले. बनावट उतारे व शिक्के सादर करुन बँकेची फसवणुक (Fraud) करण्यात आल्याचे दिसून आले. १२ मार्च २०२५ रोजी या सर्व नमुद खातेदारांच्या रकमेचा एकत्रित आकडा हा १ कोटी १ लाख २ हजार ३८४ इतका असल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. बनावट कागदपत्रे, खोटे प्रतिज्ञापत्र, खोटे डिक्लेरेशन सादर करुन नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून बँकेची फसवणुक केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दिंडोरी पोलिस (Dindori Police) करत आहेत.