Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : घरात घुसून तोडफोड; ठाकरेंच्या शिवसेनेच्या महानगरप्रमुखावर गुन्हा

Nashik Crime : घरात घुसून तोडफोड; ठाकरेंच्या शिवसेनेच्या महानगरप्रमुखावर गुन्हा

जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख आणि ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यासह इतरांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा (Case) दाखल झाला आहे.

- Advertisement -

उपनेते सुनील बागुल यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपाचे व्हिडीओ आरएसएस समर्थक व सराफ व्यावसायिक गजू घोडके यांनी फेसबुकवर (Facebook) अपलोड केल्यावर तो डिलिट करण्यासाठी वरील संशयितांनी दबाब आणल्याचे आरएसएस समर्थक किशोर उर्फ गजू घोडके यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, राजवाडे यांच्यासह मालेगाव स्टँड मित्र मंडळाचा अध्यक्ष सागर देशमुख व इतरांवरही गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

YouTube video player

सागर देशमुख, मामा राजवाडे, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरडया, विलास सनसे आणि त्यांचे वीस साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. काठेगल्लीत (Kathe Galli) राहणारे गजू घोडके (Gaju Ghodke) यांच्या फिर्यादीनुसार, काही वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुनील बागुल यांच्यासमवेत समाजसेवेचे काम करत असतांना बागूल हे चुकीचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे २७ जून रोजी व्हिडीओ बनवून बागुल यांच्या पैशांचे गैरव्यवहार आणि त्यांनी करोड़ों रुपयांची संपत्ती जमविल्याची चौकशी होऊन ईडीकडून (ED) कारवाई व्हावी, असा आरोप केला होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोड होताच, बागुल यांचे समर्थक बाळा पाठक (Bala Pathak) यांनी व्हिडीओ डिलिट करण्यास सांगितले. पण, बागुल यांच्या सांगण्यानुसार राजवाडे व सागर देशमुख यांनी फोन करून ‘सुनील बागुल (Sunil Bagul) विषयीचा व्हिडीओ डिलिट करा’, असा दम भरला. त्यानंतर,३० जून रोजी संशयितांनी घरात शिरुन हत्याराने व विटांनी मारहाण केली. मारहाण पाहून कुटुंबाने ओरडा केल्यावर राजवाडे यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन घराची तोडफोड करून ४ लाख रुपयांचे नुकसान केले व गळ्यातील सोन्याची चैन व घरातील एक लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद भद्रकाली पोलिसांत (Bhadrakali Police) दाखल केली आहे. संशयितांचा शोध सुरु असून राजवाडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...