नाशिक | Nashik
तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (२७) याचा सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) शहा (Shah) येथील घरात शिरून गावातीलच १४ जणांनी कोयता, कुन्हाड, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याच्या सहाय्याने खून (Murder) केल्याची घटना शनिवार (दि. २६) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी मयत प्रवीणच्या आई विजया कांदळकर (४४) यांनी बाबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तडीपारीची दोन वर्षांची शिक्षा भोगून आलेला प्रवीण शुक्रवारी (२५) रात्री दहाच्या सुमारास घरी आला व तो घरातच झोपलेला होता. आज सकाळी आंघोळीनंतर चहा-नाश्ता करून तो घरातच असताना ११ च्या सुमारास घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजावर काहीतरी फेकून मारल्याचा आवाज आल्याने विजया व त्यांचे पती गोरक्षनाथ दरवाजाची कड़ी उघडून बाहेर गेले असता गावातीलच सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, बाळीचा गोराणे, शरद दिगंबर गोराणे, विजय दिगंबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रवींद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगू सामे (रा. अस्तगाव), गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे या हातात कोयता, कुन्हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन घरात (House) शिरण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी प्रवीण हा जास्त शहाणा झाला का? आम्हाला धमकी देतो तो घरात आहे का असे म्हणत सर्वांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गोरक्षनाथ व विजया यांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोरक्षनाथ यांना मारहाण (Beating) करीत घराबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलवर फेकून देण्यात आले. तर विजया यांनाही घराच्या बाहेर लोटून देत सर्व घरात शिरले. त्यावेळी दोघा पती-पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, घरात शिरणाऱ्यांच्या हातातील हत्यारे पाहून मदतीला कोणीही धावून आले नसल्याचे विजया यांनी तक्रारीत म्हटले आहे. तरीही हिम्मत करत दोघेही घरात जाऊन सर्वांच्या हाता पाया पडले व मुलाला सोडून देण्याची विनंती त्यांना केली.
मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. घरातला गॅस (Gas) चालू करून घर पेटवण्याची भाषा काहींनी सुरू केली. त्यानंतर सर्जेराव, दिनेश, अतुल गोराणे यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने प्रवीण उर्फ भैय्याच्या डोक्यात, हाता-पायावर मारून त्याला जखमी केले तर अजून चौघांनी हातातील लोखंडी रॉडने भैय्याच्या डोक्यात, नाकावर, तोंडावर, हातापायावर मारून त्याला जखमी (Injured) केले. वाळीबा गोराणे यांनी काठीने तर शरद गोराणेने कुऱ्हाड डोक्यात मारली. विजय गोराणेने कोयत्याने पाठीवर वार केले. तर काहींनी विजया व गोरखनाथ यांनाही मारहाण करण्यात सुरुवात केल्याने ते घराबाहेर पळाले.
त्यानंतर जखमी प्रवीण उर्फ भैव्याला घरातून बाहेर ओढून अंगणात फेकून सर्व चौदा लोक पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोघांनी भैय्याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या डोके, नाक, तोंडातून रक्त निघत होते. तर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याचे पायही मोडलेले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वावी पोलिसांचे (Vavi Police) पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या मदतीने चुलतभाऊ राजेंद्र कांदळकर यांच्या गाडीत टाकून भैय्याला बाबीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सिन्नरच्या ग्रामीण रूणालयात (Sinnar Rural Hospital) घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर खणवाहिकेतून सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मयत भैय्या हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे दाखल होते. गावासह परिसरात अनेकांना त्याने त्रास दिलेला होता. नुकत्याच झालेल्या कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रेत भैव्या व गोराणे कुटुंबामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व हवालदार शहाजी शिंदे करीत आहेत.