Saturday, January 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : 'फी'चा फंडा वापरुन गंडा; शिखरेवाडीतील बोगस कॉल सेंटर

Nashik Crime : ‘फी’चा फंडा वापरुन गंडा; शिखरेवाडीतील बोगस कॉल सेंटर

पाच हजारहून अधिक कॉल्स

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केवळ ‘शॉप अॅक्ट लायसन्स असताना थेट कर्ज देण्यासाठी नागरिकांना (Citizen) ‘कॉल करुन कर्जाच्या रकमेनुसार ‘प्रोसेसिंग फी’ आकारुन गंडा घालणाऱ्या पवन निकमच्या ‘स्वस्तिक फिनझर्व्ह’मधून नाशिककरांना तब्बल ५ हजारांहून अधिक कॉल्स (Calls) झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, प्रकरणातील निकमची मैत्रीण व सूत्रधार प्रीती उर्फ मयूरी अरुण चौरसिया ही पसार असून तिचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

नाशिक शहर सायबर पोलिसांनी (Nashik Cyber Police) गुरुवारी (दि. ११) दुपारी सील केले असून पवन महादू निकम (रा. प्रथमेश पार्क, त्रिवेणी पार्क, जेलरोड) या संशयित सूत्रधारास न्यायालयाने (Court) १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांनी गेल्या दीड वर्षांपूर्वी शिखरेवाडीतील रजनीपार्क अपार्टमेंटमध्ये स्वस्तिक फिनझर्व्ह’ हे कार्यालय सुरू केले. कार्यालयात ‘टेली कॉलिंग साठी पाच युवतींना नेमले. त्यांच्यामार्फत गरजूंना ‘कॉल्स’ करुन कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आमिष दाखविले. या मंजुरीसाठी लोनच्या रकमेनुसारच प्रोसेसिंग फी व चार्जेस आकारले जात होते. दरम्यान, संशयितांसह महिलांनी पाच हजारांहून अधिक नागरिकांना कॉल्स केल्याचे समोर येत असून त्यातील बहुतांश जणांचे कर्जच मंजूर झाले नसल्याचे उघड झाले आहे.

YouTube video player

असा होता फंडा

निकमकडे नाशिकमधील (Nashik) शेकडो नागरिकांचे नाव व फोन नंबरची लिस्ट होती. त्याद्वारे टेलिकॉलिंग करणाऱ्या महिला गरजू नागरिकांना वारंवार संपर्क करत होते. तसे कमी व्याजासह क्षुल्लक कागदपत्रांसह कर्ज दिले जाईल, असे सांगून ‘स्वस्तिक फिनझर्व्ह’ च्या शिखरेवाडीतील कार्यालयात बोलावून घेतल्यावर साधारणतः ५० हजार ते एक लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीसाठी तीन ते दहा किंवा पंधरा हजारांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारत होते. मात्र, फाईल मंजुरीसाठी ठराविक एजंटकडे पाठवत होते. ती मंजूर झालीच नाही तर दोन ते तीन हजारांचा परतावा देऊन संबंधितास ‘गप्प’ करत होते. तरीही त्याने ओरड केलीच तर त्याला अनेक तांत्रिक कारणे सांगून वेळ मारुन नेत होते.

सीमकार्डचाही तपास

संशयितांनी १३ तक्रारदारांची ७ लाख, ७२ हजार, ५०० रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर येत आहे. पन्नास जणांपर्यंत पथक सध्या पोहोचले असून, ज्यांना कॉल झाले त्यांना आम्ही संपर्क करत आहोत. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. तांत्रिक तपासही सुरु आहे.

संजय पिसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस

ठळक मुद्दे

  • निकमने जुना डेटा नष्ट केल्याचे उघड
  • दोन एजंटाची चौकशी, मात्र ठोस माहिती हाती नाही
  • निकमकडे कोणत्याही फायनान्शसशी संलग्नता नाही
  • फाईल्ससाठी बेकायदेशीरपणे फी आकारल्याने यापूर्वी अडचणीत
  • ३३ कस्टम्बर इन्फॉर्मेशन शीट जप्त
  • ९४ सीमकार्ड कोणाच्या नावे, याचाही तपास

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...