Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : पाचशे किलो मांस जप्त; खोडेनगरातून सहा जण अटकेत

Nashik Crime : पाचशे किलो मांस जप्त; खोडेनगरातून सहा जण अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोवंशीय जनावरांचे मांस (Beef) नाशकात (Nashik) विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितांना शहर गुन्हेशाखा युनिट एकने गजाआड केले आहे. पथकाने सापळा रचून शुक्रवारी (दि.१४) वडाळा गावातील खोडेनगरात असलेल्या फॉर्च्यून अपार्टमेंटसमोर ही कारवाई केली. संशयितांच्या (Suspected) ताब्यातून ५०० किलो मांस आणि होंडा सिटी कार असा साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

शाहरूख निसार पिंजारी (वय २९, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), समीर खलील शेख (२५, रा. ममदापूर, ता. रहाता, जि. अहिल्यानगर), अयान जब्बार शेख (वय १९), आसिफ हुसैन कुरेशी (वय ३६, दोघेरा. कथडा, जुने नाशिक), हुजैफ उमरसाहब कुरेशी (वय २६, रा. बागवानपुरा, भद्रकाली, नाशिक) आणि अरमान इस्माईल शेख (३०, रा. चौकमंडई, भद्रकाली, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.

युनिट एकचे (Unit One) अंमलदार विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना शुक्रवारी (दि.१४) खोडेनगर येथे गोवंश जनावरांचे मांस पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कार (एमएच ०२-बीवाय ६८४८) मध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना कळवली. त्यांच्या सूचनेने पथकाने फॉर्च्यून अपार्टमेंटसमोर सापळा रचला. पथकाने कारमधील सहा जणांना ताब्यात घेतले असता सुमारे ५०० किलो मांस जप्त केले.

दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, पथकाने सहा जणांचा ताबा मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सोपविला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार महेश साळुंके, अंमलदार आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, चालक अंमलदार समाधान पवार यांनी कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...