Thursday, May 15, 2025
Homeक्राईमNashik Crime : वर्ग तीनचे सेवक लाचखोरीत दोषी; चालू वर्षी सापळ्यामधील पाच...

Nashik Crime : वर्ग तीनचे सेवक लाचखोरीत दोषी; चालू वर्षी सापळ्यामधील पाच जणांना शिक्षा

नाशिक | भारत पगारे | Nashik

- Advertisement -

सन २०१३ ते २०१८ या कालावधीत विविध लाचखोरी प्रकरणांतील (Bribe Case) एसीबी (ACB) सापळ्यात अडकलेल्या ‘वर्ग तीन’ मधील पाच लाचखोरांना न्यायालयाने (Court) जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत दोषी ठरवले आहे. आरोपींना दंडासह कारवासाची शिक्षा ठोठावली असून अन्य प्रकरणांचे खटले पटलावर आहेत. विशेष म्हणजे या लाचखोरीत नगरविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या महापालिकांमधील लोकसेवक आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दररोज राज्यभरात सातहून अधिक सापळे रचतो. त्यातील बहुतांश सापळे यशस्वी होतात. एसीबीच्या नाशिक, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या आठ परिक्षेत्रांतून सापळे व अपसंपदेबाबत कारवाया केल्या जातात. त्यानुसार, केलेल्या कारवायांत महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पाच लोकसेवक (Public Servant) व एक खासगी व्यक्तिस लाच स्विकारतांना पकडण्यात आले होते.

दोषसिद्धीसाठी सखोल तपासावर भर

लाचखोर तलाठी राठोडला एक लाख दहा हजार तर इतर आरोपींना दोन लाख २५ हजार असा तीन लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने दोषसिद्धी वाढवण्यासाठी सखोल तपास, साक्षीदार, तक्रारदारांचे जाबजबाब, मालमत्तेचे विवरण, आयओची भूमिका, सबळ पुराव्यांवर भर दिला जात आहे.

हे आहेत आरोपी

नागपूरमधील कुही तालुक्यातील मौजा तितूरचा तलाठी संजय नथ्थूजी राठोड (४७, रा. चंदशेषनगर, नागपूर) याला नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चार वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

मुंबई महापालिकेतील पर्यवेक्षी निरीक्षक संदीप शिवाजी नागरे याला न्यायाधिशांनी ५ मार्च २०२५ रोजी ३ वर्षे कैद व पन्नास हजारांचा दंड ठोठावला.

अशोक आनंदा रोकडे (प्रभारी मुकादम), नितीन दाजी जाधव (दुय्यम (दुय्यम अभियंता, मुंबई महापालिका) व खासगी व्यक्ती सज्जाद जब्बार खान यांना विशेष सत्र न्यायाधिशांनी प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांचा दंड २७ मार्च २०२५ रोजी ठोठावला.

लक्ष्मण धनू पवार या मुंबई महापालिकेतील भाडे पर्यवेक्षकास १६ एप्रिल २०२५ रोजी तीन वर्षे कारावास व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

दृष्टिक्षेप

चार दोषसिद्धी प्रकरणात सहा आरोपी
एक खासगी व्यक्ती व पाच सरकारी सेवक
शिक्षा मिळालेले सर्व आरोपी वर्ग तीनचे सेवक
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षा
वेळीच दोषारोपपत्रे, मालमत्ता तपास, साक्षीदारांमुळे शिक्षा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...