Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : कापडणीस दुहेरी हत्याकांडाची सुनावणी; न्यायालयाने तपासले 'पीएम' रिपोर्ट

Nashik Crime : कापडणीस दुहेरी हत्याकांडाची सुनावणी; न्यायालयाने तपासले ‘पीएम’ रिपोर्ट

खुनांतील संशयिताला व्हायचेय 'वकील'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सन २०२२ मध्ये नाशकात (Nashik) उघड झालेल्या माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय ७०) आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित (वय ३५) यांच्या दुहेरी खूनप्रकरणाची (Murder Case) नियमित सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरु झाली आहे. दरम्यान, या हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल गौतम जगताप याने एलएलबी अर्थातच वकिली अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी न्यायालयाने त्याला विधीशाखेची आवश्यक पुस्तके घेण्यासाठी तसेच प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी कारागृह प्रशासनामार्फत अर्ज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संशयित राहुल हा वकिली पास करून स्वतः विरोधातील खटला लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

राहुल याने संशयित साथीदार विकास हेमके व सूरज मोरे, प्रदीप शिरसाठ यांच्या मदतीने नानासाहेब व डॉ. अमित कापडणीस यांचे काही दिवसांच्या अंतराने खून केले होते. खून केल्यानंतर दोघांचे मृतदेह (Dead Body) जिल्ह्याबाहेर वेगवेगळ्या तालुक्यांत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. मात्र, फेब्रुवारी २०२२ मध्ये दुहेरी खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा अनेक धक्कादायक मुद्दे समोर आले. सरकारवाडा पोलिसांच्या (Sarkarwada Police) हद्दीतील पंडित कॉलनीतील आनंद गोपाळ पार्क इमारतीमध्ये राहणाऱ्या कापडणीस पिता-पुत्रांची मालमत्ता हडपण्यासाठी राहुलने थंड डोक्याने नियोजनबद्धरित्या दोघांचे खून केल्याचे उघड झाल्यावर तपासात एकूण एक कड़ी जोडत संशयितांविरोधात तब्बल सोळाशे पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित राहुल जगतापसह साथीदार संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे पोलिसांना प्राप्त आहेत. त्याची पडताळणी नाशिक कोर्टात सुरू असून, सरकारी पक्षातर्फे उज्वल निकम कामकाज पाहत आहे.

दरम्यान, ३ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत (Hearing) संशयित राहुल जगताप कायदेविषयक पद‌वी प्रवेश परीक्षा देण्यासाठी आणि या परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके टपालाने किंवा प्रत्यक्ष घेण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने कारागृह अधीक्षकांचा जबाब मागवला होता. त्यानंतर सोमवारी (दि.२४) झालेल्या सुनावणीसाठी तिथे संशयित न्यायालयात हजर होते. त्यावेळी साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात आली. तसेच अभ्यासासाठी पुस्तके मिळण्यासाठी व प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी राहुलने कारागृह प्रशासनामार्फत अधिकृतरित्या अर्ज सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर खून खटल्यातील पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे. सन २०२२ पासून राहुल व अन्य संशयित नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.

उच्च शिक्षित संशयित

संशयित राहुल जगताप याने हॉटेल मॅनेजमेंटसह एमबीए फायनान्सची पदवी घेतली आहे. काही वर्षे त्याने परदेशातही नोकरी केली. वडिलांच्या निधनामुळे तो नाशिकमध्ये परतला. त्यानंतर त्याने प्रेमविवाह केला. त्यास शेअर मार्केटचे ज्ञान असल्याने तेथेही नशीब आजमावले, तसेच आर. डी. सर्कल येथे हॉटेल सुरु केले होते. मात्र, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तो गुन्हेगारीकडे वळल्याचे बोलले जाते.

असे घडविले दुहेरी खून

२८ जानेवारी २०२२ रोजी कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल झाली. या तपासात नानासाहेबांच्या डीमॅट खात्यातून ९० लाख शिरसाठच्या खात्यात वर्ग झाल्याचे समजले. त्याने हे पैसे जगतापकडे दिल्याचे समजले. जगतापच्या चौकशीत दोघांचा खून झाल्याचे उघड झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने नानासाहेबांचा मृतदेह मोखाडा, तर अमितचा राजूर येथे जाळून टाकला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : यंदा २०० पाणी टँकरचे नियोजन; जिल्हा प्रशासनाचा टंचाई...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्हा प्रशासनाने (District Administration) यंदाही पाणीपुरवठ्यासाठी टंचाई आराखडा जाहीर केला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला...