Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : म्हस्के टोळीचा सूत्रधार ताब्यात; गुंडाविरोधी पथकाने संगमनेरमधून पकडले

Nashik Crime : म्हस्के टोळीचा सूत्रधार ताब्यात; गुंडाविरोधी पथकाने संगमनेरमधून पकडले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या वर्षी जयभवानी रोड परिसरात (Jay Bhwani Road) दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेल्या चौघांना उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) अटक केली असता, टोळीचा म्होरक्या मात्र पसार झाला होता. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने म्हस्के टोळीच्या या सूत्रधारास संगमनेरमधील (जि. अहिल्यानगर) गुंजाळवाडीतून अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के (२९, रा. भालेराव मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे संशयिताचे (Suspect) नाव आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री जयभवानी रोडवरील उपनगर पोलिसांच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गावठी कट्ट्टा, दोन जिवंत काडतुसे, कोयता, दोर, मिरची पूड यासह अटक केली होती. परंतु अंधाराचा फायदा घेत टोळीचा म्होरक्या सागर पसार झाला होता. गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथक संशयित सागरच्या मागावर असतानाच, पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना संशयित सागर हा संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, पथक सोमवारी (दि. १०) संगमनेरमध्ये दाखल झाले. संशयित सागरचा ठावठिकाणा माहीत नसताना पथकाने (Squad) स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो गुंजाळवाडीतील लक्ष्मीनगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. सागरला पोलिसांची चाहूल लागताच तो दुचाकीवरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने संशयित सागरला पाठलाग करीत जेरबंद केले.

दरम्यान, शहर पोलिसांना (City Police) गंभीर स्वरुपाच्या पाच गुन्ह्यामध्ये सागर पाहिजे असलेला संशयित होता. त्यास अटक करीत उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनिता कवडे यांच्या पथकाने कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...