Wednesday, May 21, 2025
Homeक्राईमNashik Crime : रोकड लांबवणाऱ्या तिघांना बेड्या

Nashik Crime : रोकड लांबवणाऱ्या तिघांना बेड्या

नाशिक | फारूक पठाण | Nashik

- Advertisement -

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीत चेतनानगर येथे एका चारचाकी गाडीची काच फोडून दीड लाखांची रोकड लांबविणाऱ्या तिघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने घोडबंदर ठाणे येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या. चेतनानगर येथे (दि.१३ मे) एका चारचाकी गाडीची काच फोडून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली. त्यामध्ये असे दिसून आले की, एक मोटारसायकलवर दोन व्यक्ती हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीची काच फोडून त्यातील रोख रक्कम घेवून पळून जातांना दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) माध्यमातून सतत चार दिवस परिश्रम घेवून नाशिक ते मालेगांव (Nashik to Malegaon) असे जवळपास ९०. कि.मी. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांची नांव व पत्ता निष्पन्न करून संशयित हे घोडबंदर भागातील असल्याचे प्राथमिक माहीती मिळाली. त्यावरून मिळालेल्या माहीतीच्या आधारे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, सहायक उपनिरीक्षक बाळु शेळके, अंमलदार संजय सानप, प्रकाश महाजन, सुनील खैरनार यांचे पथक तयार करून पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या परवानगीने, घोडबंदर बंदर ठाणे येथे पाठवले.

त्यानंतर या पथकाने सतत दोन दिवस तेथे थांबून संशयित आरोपी यांचे संपूर्ण नांव पत्ता निष्पन्न करून सॅम्युअल हरेल परेरा (५७ वर्ष, रा.टी. २४/२४०८, पुराणिक सिटी, मोदरपाडा, घोडबंदररोड, ठाणे पश्चिम), हरीष उर्फ अजय रवि गुडेटी, (३५ वर्ष, रा. थिप्पा कॉलनी, बोगडू, मंडलम, अल्ली मडगु दारणावरम, जि. नेल्लोर, राज्य, आध्रप्रदेश), अभिजीत गणेश प्रसाद (३० वर्षे, रा. ठुकाईमाता मंदिराजवळ, ठुकाईनगर, ता. दौंड, जि. पुणे) यांना घोडबंदर ठाणे येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे एकूण ५ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा (Case) उघडकीस आणला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Politics : मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर? छगन भुजबळ मंत्री झाल्याने...

0
नाशिक | फारूक पठाण | Nashik मुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात काही ठिकाणी महायुती (Mahayuti) तर काही ठिकाणी...