Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : सराईत गुन्हेगारांची बाजारपेठांमधून धिंड; म्हसरूळ पोलीस ॲक्शन मोडवर

Nashik Crime : सराईत गुन्हेगारांची बाजारपेठांमधून धिंड; म्हसरूळ पोलीस ॲक्शन मोडवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी म्हसरूळ पोलिसांनी थेट अॅक्शन मोड अवलंबत सराईत गुन्हेगारांची बाजारपेठांमधून धिंड काढत जनतेसमोर एक स्पष्ट संदेश दिला.

- Advertisement -

कणसरा माता चौक, शांतीनगर, अश्वमेध नगर, चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद, आणि म्हसरूळ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा, स्थानिक गुन्हेगारी कमी व्हावी, व परिसरात सुरक्षितता वाढवावी, यासाठी ही धडाकेबाज मोहीम हाती घेण्यात आली होती.

YouTube video player

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, योगेश परदेशी, जी.सी. जोशी यांनी कारवाई करत सराईत गुन्हेगार हर्ष प्रदीप काकडे (२०), ओमकार नगर; ओम खंडू आहेर (१९), वाढणे कॉलनी; धनराज गणेशकर, विद्यानगर; उमेश खनपटे आणि करण आहेर (अश्वमेध नगर) यांची धिंड काढली.

दरम्यान, पोलिसांच्या (Police) या कृतीला स्थानिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी अशा गुन्हेगारीविरोधातील मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

म्हसरूळ परिसर गुन्हेगारीमुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे गुन्हेगारी, भाईगिरी यांना यापुढे कोणतीही ठाव देण्यात येणार नाही. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा, यासाठी कठोर मोहिमा राबविण्यात येतील. येणाऱ्या काळात अशाच कारवाया सातत्याने चालू राहतील. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे

ताज्या बातम्या

‘कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे राजकारणाची …’ – मनसे अध्यक्ष...

0
मुंबई । हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच व्यासपिठावर एकत्र आले असल्याचे बघायला...