Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : तडीपारांचा वाढता उच्छाद; सराईतांचा एकाच रात्रीत दोन ठिकाणी राडा

Nashik Crime : तडीपारांचा वाढता उच्छाद; सराईतांचा एकाच रात्रीत दोन ठिकाणी राडा

कठोर कारवाईची अपेक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील वर्षों जुलैत स्थानबद्धतेच्या कारवाईतून (Action) जेलमधून सुटताच स्वतःची जंगी मिरवणूक काढणा-या सराईत तडीपाराने साथीदारांसह बारा तासांत दोन ठिकाणी प्रचंड राडा (Rada) घातल्याचे शनिवारी (दि.८) समोर आले. सराईतांनी (Criminal) दोन वेगवेगळ्या ठिकाणी साथीदारांसह गुंडगिरी करीत सोन्याची चेन, रोकड हिसकावून नेत खंडणी मागितल्याची, महिलेचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या.

- Advertisement -

याप्रकरणी संशयित हर्षद सुनील पाटणकर (२५, रा. बेघेलनगर, शरणपूर रोड) याच्यासह त्याच्या इतर सराईत साथीदारांविरोधात आडगाव व सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Adgaon and Sarkarwada Police Stations) गुन्हे दाखल झाले आहेत. आडगाव पोलिसांनी हर्षदला अटक केली आहे. पंकज चंद्रकांत राकिबे (३७, रा पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हर्षदसह सुमीत बगाटे व इतर १० ते ११ जणांनी आडगाव शिवारातील बळी मंदिराजवळील सतनाम राजपूत याच्या घरावर शनिवारी ९.३० वाजता दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडल्या.

दरम्यान, त्यामुळे पंकज यांनी हर्षदला जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ केली. राजपूतला ५ लाख रुपये द्यायला सांग’ अशी धमकी दिली. त्यानंतर पंकज यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील १ तोळे वजनाची सोन्याची चेन व तेराशे रुपयांची रोकड असा ४१ हजार ३०० रुपयांचा ऐवज हिसकावला. याप्रकरणी संशयितांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात दरोडा, खंडणी, मारहाण या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

पिस्तूल रोखले

शरणपूर रोडवरील बेथेलनगर परिसरात शनिवारी रात्री १०. ४० वाजता तडीपार हर्षदसह वेदांत चाळगे, राहुल पवारसह इतरांनी गोंधळ घातला. त्यामुळे परिसरातील रहिवाशाने त्यास विरोध केल्यानंतर संशयितांनी रहिवाशास मारहाण केली. त्यामुळे रहिवाशाच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिचा विनयभंग करीत गळ्यातील सोन्याची चेन ओस्बाडली. त्यानंतर महिलेवर पिस्तूल रोखून पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारेल अशी धमकी दिली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात हर्षदसह त्याच्या साथीदारांविरोधात दरोडा, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सराईत गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यास तडीपार केले त्यानंतर त्यास वर्षभर नाशिकरोड काररागृहात स्थानबद्ध केले होते. तेथून सुटल्यानंतर त्याने समर्थकांसह मिरवणूक काढत दहशत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्यासह समर्थकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...