Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : पगाराच्या पॅकेजच्या अमिषाने २३ लाख रुपयांचा गंडा

Nashik Crime : पगाराच्या पॅकेजच्या अमिषाने २३ लाख रुपयांचा गंडा

सायबर चाेरट्यांनी चार जणांना केले लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मलेशिया डेअरी इंडस्ट्रिज प्रा. लि आणि टाटा माेटर्स अशा मल्टिनॅशनल कंपनीत भरघाेस पगारासह सर्वच सुविधा देण्याच्या बहाणा करत सायबर चाेरट्यांनी (Thieves) शहरातील तीन ते चार नाेकरी इच्छुक तरुणांकडून २३ लाख ३८ हजार रुपये उकळले आहेत. याबाबत वेगवेगळ्या माेबाईल नंबरवरुन संपर्क साधणाऱ्या वेगवेगळ्या पाच ते सात संशयितांवर (Suspected) गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरात यापूर्वी देखिल अनेकांना हाेम अरेस्ट, वर्कफ्राॅम हाेम व अन्य कारणांनी गंडा घालण्यात आला आहे. त्यानुसार, वरील प्रकरणात नाेकरीचे आमिष दाखवून एज्युकेशन व्हेरिफिकेशन व अन्य कारणांसाठी या तरुणांकडून वेगवेगळी रक्कम आकारुन फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार, ते चांगल्या नाेकरीतून जास्तीचे पॅकेज मिळविण्याचा प्रयत्न करत हाेते. त्याचवेळी संशयित सायबर चाेरट्यांनी (Cyber ​​Thieves) १० सप्टेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत 8527850676, 8342801970 व 8573020856, 7428119337, 9711020012 या संशयित माेबाईल क्रमांकांवरुन संपर्क साधला.

‘आम्ही, करिअर बिल्डर्स एचआर एजन्सी आणि इंडीड डाॅटकाॅम या कंपनीतून बोलत असल्याचे भासविले. टाटा मोटर्स व मलेशिया डेअरी कंपनीमध्ये जॉब मिळवून देताे असे सांगून विश्वास संपादन केला.दरम्यान, नाेकरी मिळविण्याकरिता जाॅब रजिस्ट्रेशन, ऑफिस फि, एज्युकेशन फि आणि व्हेरिफिकेशन, इंटरव्युह प्रिपरेशमसाठी नाममात्र शुल्क भरण्यास प्रवृत्त केले. यानंतर संशयितांनी चारही तक्रारदारांना ऑनलाईन पे लिंक शेअर करत विविध बँक खात्यांत (Bank Accounts) २३ लाख ३८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.

दरम्यान, लाखाे रुपये भरुनही नाेकरी मिळत नसल्याने चाैघांनाही संशय आला. त्यांनी अधिक माहिती घेतली असता वरील कंपन्यांकडून काेणतीही नाेकरी वा पॅकेज उपलब्ध नसल्याचे समाेर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून संशयित फाेन नंबर, ज्या बँक खात्यांत पैसे वर्ग झाले त्याचा तपशिल मिळविण्याचे काम सायबर पाेलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...